पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्याच्या (Pune News) कोथरुड एरंडवणे भागात दोघांना झिकाचा (Zika Virus) प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर आणखी एका रुग्णाला झिकाची लागण झाल्याने पुणेकरांची चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र आता ही संख्या सहा वर पोहोचली आहे. आतापर्यंत पुण्यातील ६ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. झिका व्हायरस बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पुणेकरांची धाकधुक वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभाग आणि पुणे महापालिका सतर्क झाली आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एरंडवणे या भागात २८ वर्षीय महिलेला झिका विषाणूची लागण झाली आहे. या गर्भवती महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याआधीही एका गरोदर महिलेला झिका विषाणूची लागण झाली होती. सध्या या दोन्ही गरोदर महिलांची प्रकृती स्थिर आहे. गरोदर महिलांना झिका विषाणूची लागण झाल्याने भ्रूणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, पुण्यात झिका व्हायरस वेगाने पसरत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या बाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता पुणे आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासन सतर्क झाली असून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत, असे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश दिघे यांनी सांगितले.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…