Bombay High Court : भरघोस पगारासह मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी!

जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता


मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी नोकरीची सुवर्णसंधी (Government Job) चालून आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court Recruitment) रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत मानधनाच्या नियमांनुसार ही भरती जारी केली असून या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी असल्यामुळे इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा असे सांगण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयात पात्र तरुणांना महाव्यवस्थापक पदासाठी नोकरीची संधी मिळत आहे. या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून उमेदवारांना आपले अर्ज https://bombayhighcourt.nic.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. उमेदवारांसाठी ९ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.



वय व शैक्षणिक पात्रता


या नोकरीसाठी २५ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही संधी आहे. या नोकरीसाठी एमबीए किंवा डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे. त्यांना ५ वर्षांचा अनुभव आणि प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन, आयटी व्यवस्थापन,एचआर याचे शिक्षण झालेले असावे. सरकारी संस्था किंवा प्रतिष्ठित कंपनीत कामाचा किमान ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.


अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी आहे त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत पात्र ठरल्यानंतर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. पात्र उमेदवारांना ५७ हजार ५०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही