Amravati News : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

६ जण गंभीर जखमी


अमरावती : अमरावती (Amravati News) जिल्ह्यात बसला मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सातपुडा पर्वतरांगातील मेळघाटवरुन मध्यप्रदेशच्या दिशेने धावणाऱ्या बसचा दरीत कोसळल्यामुळे भीषण अपघात (Bus Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले असून ८ ते १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस अकोट तालुक्यातील पोपटखेडच्या रस्त्यावरुन जात होती. मात्र वळणा वळणाच्या रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने सातपुडा पर्वतरांगातील मेळघाटमधील खटकालीजवळील 'हाय पॉईंट' जवळ ही बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक मदतीसाठी घटनास्थळी धावले. प्रवाशांना दरीतून वर काढून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.



जखमींची माहिती


बसमध्ये २५ ते ३० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अकोटवरून एकलव्य बचावपथक आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या. अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले असून ८ ते १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने बसमधील सर्व लहान मुले सुरक्षित आहेत.



स्थानिकांची मागणी


मेळघाटमधील सातपुडा पर्वतरांगातील हाय पॉईंट जवळ खाजगी ट्रॅव्हल्स पलटी होऊन दरीत कोसळली. अकोल्यातील अकोट शहरातून अ‍ॅम्बुलन्स आणि एकलव्य बचाव पथकासह वनविभाग घटनास्थळी दाखल झाल्याने जखमींना बाहेर काढण्यास यश आले. मात्र या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्या, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या