Yavatmal Accident : यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चार जण ठार

इनोव्हा कार ट्रकला धडकल्याने झाला अपघात 


यवतमाळ : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून आता यवतमाळमधूनही एक भयंकर अपघाताची घटना (Yavatmal Accident) समोर आली आहे. इनोव्हा कार ट्रकला धडकल्यामुळे कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज पहाटे यवतमाळ -नागपूर महामार्गावरील (Yavatmal Nagpur Highway) चापरडा गावाजवळ हा अपघात (Road Accident) झाला.


प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये पंजाबमधील एका कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ-नागपूर महामार्गावर एका इनोव्हा गाडीतून हे शीख कुटुंब प्रवास करत होते. हे सर्वजण पंजाबवरुन आले होते. ते नांदेड येथील गुरुद्वारामध्ये चालले होते. त्यांची इनोव्हा कार चारपडा गावाजवळ असताना गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार समोर असलेल्या ट्रकवर जोरात जाऊन आदळली.


ही धडक इतकी जोरदार होती की, इनोव्हा कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. इनोव्हा कारच्या बोनेटचा भाग जोरात धडक झाल्यामुळे ट्रकच्या मागच्या भागात शिरला. त्यामुळे बोनेटचा पत्रा उखडला गेला आणि पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. या गाडीत एअरबॅग्ज नव्हत्या. त्यामुळे चालकासह मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली. या जोरदार धडकेत इनोव्हा कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. या अपघाताचा तपास यवतमाळ पोलिसांकडून (Yavatmal Police) सुरू आहे.

Comments
Add Comment

65th Maharashtra State Art Exhibition: सांगलीत रंगणार ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन; ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा होणार सन्मान

मुंबई: कला संचालनालयामार्फत आयोजित ‘६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग)’ यंदा सांगली येथे

Navnath Ban: काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये; नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास मोठे यश; ऊसतोड कामगारांच्या मुला - मुलींना दर्जेदार शिक्षणाची वाट मोकळी

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड जिल्ह्यात आणखी ११ वसतिगृहे उभारणीस शासनाकडून १५९.३६ कोटी रुपये निधी

Niranjan Davkhare: शहापूरसाठी नव्या पाणीपुरवठा योजनेला तातडीची मंजुरी द्यावी, आमदार डावखरेंचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

ठाणे: शहापूर नगरपंचायतीच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी

Divya Shinde On Bigg Boss Marathi 6: बिग बॉसने खरं फुटेज दाखवलं नाही; पत्रकार परिषद घेत दिव्या शिंदेचा गंभीर आरोप

मुंबई: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात घरातील

NCMC Card: एनसीएमसी कार्ड असेल तरच मिळणार एसटी बस प्रवासात सवलत; जाणून घ्या एनसीएमसी कार्ड बद्दल

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी 'नॅशनल