मेधा पाटकर यांना ५ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Share

मानहाणी प्रकरणी साकेत न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहाणी प्रकरणी दिल्लीतील साकेत न्यायालयाने आज (दि. १) पाच महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना १० लाख रुपये नुकसान भरपाईचे आदेशही दिले. दरम्यान, निकाल सुनावताना न्यायालयाने स्पष्ट केले की, मेधा पाटकर यांचे वय आणि प्रकृती लक्षा घेता त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होईपर्यंत ३० दिवस तुरुंगवासाची शिक्षा स्थगित राहणार आहे.

दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी २००१ मध्ये मेधा पाटकर यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावेळी सक्सेना हे अहमदाबाद येथील नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजचे प्रमुख होते. एका दूरचित्रवाहिनीवर त्यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी आणि बदनामकारक विधान केल्याप्रकरणी त्यांनी मेधा पाटकर यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.

२००१ पासून या प्रकरणी मेधा पाटकर कायदेशीर लढाई लढत होत्या. या प्रकरणी मेधा पाटकर यांना मे महिन्यात दोषी ठरवण्यात आले होते. आज दिल्लीतील साकेत न्यायालयाने त्यांना पाच महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सक्सेना यांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, या निकालानंतर माध्यमांशी बोलताना मेधा पाटकर म्हणाल्या की, “सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही… आम्ही कोणाचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. आम्ही फक्त आमचे काम करतो. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देऊ.”

Recent Posts

महाराष्ट्र लोक हक्क अधिनियम २०१५च्या कायद्याची १५ दिवसात होणार अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी लागू करण्यात आलेले महाराष्ट्र लोक…

30 mins ago

तुम्ही Jio युजर्स आहात का? तर हे जरूर वाचा

मुंबई: रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्लानचे दर बदलले आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.…

43 mins ago

एलईडी मासेमारी पूर्णतः बंद करा; आमदार नितेश राणे विधानसभेत आक्रमक

मोठ्या रक्कमेचा दंड आणि शिक्षा होईल अशा पद्धतीचे कायदे अमलात आणा आमदार नितेश राणेंच्या मागणी…

1 hour ago

नार्वेकरांमुळेच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा होणार पराभव

शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी वर्तविले भाकीत मुंबई : ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची विधानपरिषद निवडणुकीसाठी…

2 hours ago

मुंबईमध्ये पावसाळी साथीच्या आजारांचा ‘टक्का’ घसरला

गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत यंदा निम्म्याहून कमी प्रकरणे मुंबई : गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत…

2 hours ago

कारभार सुधारा अन्यथा कारवाई करू – नितीन गडकरी

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत पालघरचे खा.हेमंत सवरा यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन…

2 hours ago