Nashik news : नाशिक शिक्षक मतदार संघाची मतमोजणी थांबवली! काय आहे कारण?

नाशिक : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. एकाच मतपेटीत तब्बल ३ मतपत्रिका जास्त आढळून आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने यावर आक्षेप घेतला आहे. सध्या ही मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे मतमोजणी केंद्रावर प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे.


जळगाव जिल्ह्यातील चोपडा गावातील २२ क्रमांकाच्या बुथवर ९३५ इतकं मतदान झालं आहे, पण मतपेटीमध्ये ९३८ मतपत्रिका आढळून आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ही मतपेटी बाजूला ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. मुख्य निवडणूक आयोगाने याबाबत कारवाई करून निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे.


सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. ३० टेबलवर मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे १८० कर्मचारी मतमोजणी करत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे. आता मतमोजणी प्रक्रिया थोड्यावेळाकरता थांबवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी