कौटुंबिक पातळीवर आनंद असेलमेष : नवीन प्रकल्प किंवा मोठी गुंतवणूक टाळणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे व्यवसाय अडचणीत जाणवण्याची शक्यता आहे. नवीन आव्हाने व कामातील नवीन बदल काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. तुमची वागणूक अतिशय चांगली असणार आहे. अधिकार प्राप्तीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आणि मित्रांसमवेत कुटुंबीयांशी चांगले संबंध कसे ठेवावेत याचे तुम्ही धडे घेत आहात. कौटुंबिक पातळीवर आनंद असेल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी होतील आणि त्या तुमच्यासाठी लाभदायी आणि उपयुक्त ठरणार आहेत. | |
कठीण समस्या सोडवालवृषभ : आपण आपल्या बुद्धिकौशल्याद्वारे कठीण समस्या सहजगत्या सोडवाल. कौटुंबिक पातळीवरही आणि आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला यश मिळणार आहे. पोलीस दलातील किंवा डिफेन्समध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना साहसपूर्ण कार्य करण्यासाठी सन्मान होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्ती स्पर्धा परीक्षांना बसणार आहेत त्यांना चांगले यश मिळून. सरकारी नोकरी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत सहज साध्य यश मिळणार आहे. आपल्या अधिकार पद्धतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र वैवाहिक जीवनात चढ-उताराची परिस्थिती असू शकते. नोकरी करणाऱ्या महिलांनी कामाचे नियोजन करावे. | |
साहस आणि धैर्याने काममिथुन : आपल्या कार्यक्षेत्रात साहस आणि धैर्याने काम केल्यामुळे आपणास प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. व्यापार व्यावसायिकांना बाजारात मंदी असली तरीही आपल्या स्वतःच्या व्यापारामध्ये विशेष फरक पडणार नाही किंवा आपल्याला जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल, तर एलआयसी किंवा म्युच्युअल फंडामध्ये केल्यास आपल्यासाठी ते उपयुक्त होणार आहे. विद्यार्थी आपल्या शिक्षणाव्यतिरिक्त एखादी कला जोपासण्याचा प्रयत्न करतील, त्यात त्यांना चांगले यश येणार आहे. प्रेमी-प्रेमिका यांनी मात्र सावध पावले उचलावीत. महिलांना स्वतःच्या कामामुळे प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. | |
चांगले यश प्राप्त होईलकर्क : आपल्या योजना कार्यान्वित होण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. या कालावधीमध्ये आपण आपल्या महत्त्वाकांक्षेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहात. ज्या व्यक्ती रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये काम करत आहेत त्यांना चांगल्यापैकी यश मिळणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये कलह होऊ शकतो. त्यामध्ये जास्त वाद-विवाद वाढवू नका. मन शांत ठेवणे फार आवश्यक आहे अन्यथा त्याच्या कार्यक्षेत्रावर परिणाम होऊ शकेल. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये आपली एनर्जी लेव्हल खूप चांगली असणार आहे. कामाचा वेग वाढून कामांमध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे. | |
यशस्वी होणारसिंह : हा सप्ताह आपणास संमिश्र घटनांचा आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या मार्गात अडचणी आल्या तरी आपण स्वतःचे खच्चीकरण करून घेऊ नका. आत्मविश्वासाने पुढे जाल. सर्व कामे चांगल्या प्रकारे निभावून न्याल. सरकारी कामांमध्ये जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. आपले प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्याला जास्त काम करावे लागणार आहे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यश येणार आहे. आपल्या सकारात्मक बोलण्याने आपली कामे चांगल्याप्रकारे यशस्वी होणार आहेत. | |
विकास होणारकन्या : व्यावसायिक क्षेत्रांमध्ये तुम्ही चांगले योगदान देणार आहात. तुमचे ध्येय निश्चित असणार आहे. एखादे काम हाती घेतल्यावर ते पूर्णपणे होईपर्यंत तुम्ही थांबणार नाही. मात्र आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अहंकाराचा भाव येण्याची शक्यता आहे. आपली जबाबदारी वाढणार आहे. पण सर्व दृष्टीने सतर्क राहणे फार आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार नीट सांभाळावेत. आपल्या स्वभावामध्ये समतोल ठेवा. जेणेकरून आपणास चांगले फायदे मिळतील. या कालावधीमध्ये आपला विकास होणार आहे. | |
चांगली प्रगतीतूळ : या काळात तुम्ही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. ऐशआरामी जीवन जाणार आहे. पण आपण खर्चावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. कौटुंबिक आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. खासगी व्यावसायिक पातळीवर कोणाशीही व्यवहार करताना जपून वागा. या कालावधीमध्ये नवीन कामातून अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. आपल्या उत्पन्नात निश्चितच वाढ होणार आहे. आपल्या पदामध्ये व स्थानात वृद्धी होईल. आपल्या नवीन योजना कार्यान्वित करण्याचा कालावधी आहे. व्यावसायिक पातळीवर चांगली प्रगती करणार आहात. | |
सर्व बाजूने यशवृश्चिक : या कालावधीमध्ये आपल्याला सर्व बाजूने यश मिळणार आहे. आपल्या व्यावसायिक क्षेत्रात आपण चांगली उंची गाठणार आहात. आपणास चांगला मोबदला आणि स्वतःची ओळख तसेच दोन्ही गोष्टी आपणास मिळणार आहेत. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ होणार आहे. कौटुंबिक आयुष्य सुखी असणार आहे. एखादी चांगली संधी चालून येईल. स्वतःला व्यक्त करण्यासाठी, सुजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या कालावधीमध्ये आपण निश्चितच यशस्वी होणार आहात. | |
नवीन संधीधनु : हा कालावधी आपणासाठी चांगला असणार आहे. जास्त प्रयत्न न करता आपल्याला नवीन संधी मिळणार आहेत. घरी किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होणारे नवीन बदल आपल्या पथ्यावर पडतील. तुम्ही यावेळी काही निश्चित निर्णय घ्याल, ते निर्णय आपल्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी सहाय्यक ठरणार आहेत. कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी राहू शकतात. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधणार आहात. | |
व्यावसायिक पातळीवर प्रगतीमकर : अचानक भावनेच्या आहारी जाऊन किंवा अपेक्षा भंगामुळे काही चुकीचे निर्णय घेऊ नका. निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष केल्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. एखादे अचानक नुकसान होऊ शकते यासाठी सर्वतोपरी काळजी घ्या. शुभग्रहांचे भ्रमण आपल्या राशीतून होत असल्यामुळे तुमचे वागणे प्रभावशाली असणार आहे. तुमचे ओळखीच्या व्यक्तींशी संबंध मित्रत्वाचे करण्यात यश मिळेल. एखाद्या व्यवहारात आपणास आर्थिक फायदा होणार. वाहन खरेदी किंवा मालमत्तेची खरेदी होऊ शकते. वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून आपणास पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. | |
व्यक्तिगत इच्छा पूर्णकुंभ : नशिबाचे दान आपल्याविरुद्ध पडत आहे, असे आपणास वाटणार आहे. भागीदाराकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास फारसे लाभदायक ठरणार नाहीत. आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्तीशी वाद वाढवण्याची शक्यता आहे. आपल्या वरिष्ठ व्यक्तींबरोबर आपला सुसंवाद राहणार आहे. पुढील वाटचालीमध्ये आपणास त्याचा चांगला फायदा होईल. नवीन कल्पना अमलात आणण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे. आपल्या घराकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अाध्यात्मिक बाजूकडील लक्ष दिल्यास तुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण होतील. | |
प्रयत्नांना यशमीन : आपणास काही त्रास, खच्चीकरण येऊ शकते. पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे आवश्यक आहे. जबाबदार, प्रभावशाली व्यक्तींकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही प्रगती करणार आहात. उद्योग, व्यवसायात समृद्धी लाभणार आहे. नोकरी करत असाल, तर बढती योग आहेत. कल्पक आणि बौद्धिक ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल कालावधी आहे. चांगले संबंध, संवाद यातून तुम्हाला नव्या संधी मिळतील. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. अाध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही वरची पातळी गाठणार आहात. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. |
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…