Sunita Williams : सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पुन्हा पृथ्वीवर येणार की नाही?

  156

इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली महत्त्वाची माहिती


मुंबई : भारतीय वंशाच्या अंतराळवीर (Astronaut) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी ५ जून रोजी अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण केलं होतं. त्यांच्यासह त्यांचे सहकारी बुच विल्मोर (Butch Wilmore) देखील होते. या गगनभरारीचं जगभरातून कौतुक करण्यात आलं. मात्र, सुनीता विल्यम्स यांचे अंतराळयान स्टारलाइनरमध्ये (Starliner) तांत्रिक बिघाड झाला असून त्याचे पृथ्वीवर परतणे कठीण झाले आहे. १४ जून रोजी ते पृथ्वीवर परतणार होते, मात्र या बिघाडामुळे ते अद्याप परतू शकलेले नाहीत. याप्रकरणी नासाकडून (NASA) शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, यावर इस्रो प्रमुख एस. सोमनाथ (S. Somnath) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.


'सुनीता विल्यम्स यांच्या परतण्याचा चिंतेचा विषय नसावा, लोकांना दीर्घकाळ राहण्यासाठी स्पेस स्टेशन हे सुरक्षित ठिकाण आहे, अशी प्रतिक्रिया एस सोमनाथ यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "हे फक्त सुनीता विल्यम्स किंवा इतर कोणत्याही अंतराळवीरांबद्दल नाही. त्यांना एक ना एक दिवस परत यावे लागेल. संपूर्ण मुद्दा बोईंग स्टारलाइनर नावाच्या नवीन क्रू मॉड्यूलच्या चाचणीचा आहे. ते सुरक्षितपणे परत येण्याच्या क्षमतेबद्दल आहे. ISS हे लोकांसाठी दीर्घकाळ राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे.


नवीन अंतराळयानाचे पहिले उड्डाण करण्याच्या धाडसाबद्दल त्यांनी विल्यम्स यांचे कौतुक केले. एस सोमनाथ म्हणाले, "आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान आहे. त्यांच्या नावावर अनेक मोहिमा आहेत. नवीन अंतराळ यानाच्या पहिल्या उड्डाणावर प्रवास करणे ही एक धाडसी गोष्ट आहे. ते स्वत: डिझाइन टीमचा भाग आहे आणि त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या इनपुटचा वापर केला आहे."


नासाचे दोन अंतराळवीर ISS वर अधिक काळ राहू शकतात. नासाने शुक्रवारी अंतराळवीरांच्या परतीची कोणतीही तारीख दिली नाही, परंतु ते सुरक्षित असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय