मुंबई : अभिनेता प्रभास (Prabhas) याचा बहुचर्चित असणारा ‘कल्की २८९८ एडी’ (Kalki AD 2898) चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सध्या जगभरात बॉक्स ऑफिसवर (Box Office) राज्य करत आहे. अवघ्या दोन दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. तर लवकरच ३०० कोटींचा टप्पा ओलांडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. अनेक चित्रपटगृहांचे शो सध्या हाऊसफुल होत आहेत. देश परदेशात प्रभासच्या या ‘कल्की २८९८ एडी’ बाबत चर्चा सुरु असताना प्रभासच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे.
‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाला भरघोस यश मिळत असताना आता ‘कल्की २८९८ एडी-भाग २’ (‘Kalki AD 2898’ Part 2) येणार असल्याची माहिती मिळत आहे. चित्रपट निर्मात्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ‘कल्की २८९८ एडी’ची गोष्ट पाहता निर्मात्यांनी त्यावेळीच दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आधीपासूनच चित्रपटाचा भाग २वर काम करण्यास सुरुवात केली होती. सध्या कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर जोरदार काम सुरू आहे. या चित्रपटाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता चित्रपटाचे व्हिएफएक्स (VFX ) वर काम सुरू असून लवकरच हा चित्रपट भेटीला येणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले.
दरम्यान, दक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा अभिनेता रजनीकांत यांनी देखील ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट पाहिला. त्यावेळी त्यांनी एक पोस्ट शेअर करून या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टीच्या रिलीजची वाट मी पाहात असल्याचे म्हटले होते. त्यासोबतच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०००कोटींचा टप्पाही पार करेल असे प्रभासचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगताना दिसत आहेत.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…