मुंबई : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची पाऊले उचलत असते. काही दिवसांपूर्वीच आरबीआयने येस बँक (Yes Bank), आयसीआयसीआय (ICICI) बँक आणि उत्तरप्रदेशातील पूर्वांचल को-ऑपरेटिव्ह या बँकांनी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी त्यांच्यावर चांगलाच दणका (RBI Action) बसवला होता. त्यानंतर पुन्हा अशाच बँकेवर आरबीआयने मोठी कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (HSBC) वर २९.६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि रुपी डिनोमिनेटेड को-ब्रँडेड प्रीपेड कार्डच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल HSBC बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.
बँकेवर कारवाई करताना आरबीआयने म्हटले आहे की, वर्षापूर्वी आरबीआयकडून या बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी आरबीआयच्या निर्देशांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. त्या संदर्भात बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. त्यामध्ये बँकेला कारणे देण्यास सांगण्यात आले होते, या सूचनांचे पालन न केल्याने बँकेला दंड का आकारण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली होती.
त्यादरम्यान, बँकेने दिलेला प्रतिसाद, वैयक्तिक हजेरी दरम्यान दिलेले तोंडी उत्तर आणि बँकेने दिलेली अतिरिक्त माहिती लक्षात घेतल्यानंतर असे आढळून आले की, इतर गोष्टींबरोबरच, बँकेवरील आरोप सिद्ध झाले आहेत. ज्यासाठी आर्थिक दंड आकारणे आवश्यक होते.
आरबीआयला या बँकेने आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा उद्देश नाही. आर्थिक दंड लादल्याने आरबीआय ने बँकेविरुद्ध सुरू केलेल्या इतर कारवाईचा बँकेच्या कोणत्याही व्यवहारावर विपरीत परिणाम होणार नाही. त्यासोबत या बँकेतील खातेदारांनाही बँकेचा कोणताही दंड भरावा लागणार नाही.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…