मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या विविधांगी भूमिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेला अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हे जोडपं सोशल मीडियावर (Social media) कायम चर्चेत असतं. काही दिवसांपूर्वी या जोडप्याचा लंडनमध्ये फिरत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये विकी कतरिनाची काळजी घेताना दिसला होता. यामुळे कतरिना प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, विकी कौशल आपल्या आगामी ‘बॅड न्यूज’ (Bad newz) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी आला होता, यावेळेस पॅपराझींनी अखेर त्याला याबाबत प्रश्न विचारलाच. यावेळेस विकीनेही मौन सोडलं आहे.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला जवळपास ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. बॅड न्यूज चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी पॅप्सने विकी कौशलला विचारले, ‘खरी गुड न्यूज कधी येणार आहे?’ यावर विकी कौशलने आधी स्मित हास्य करत म्हटले की ‘जेव्हा ती गुड न्यूज येईल तेव्हा मी तुम्हा सर्वांना सांगेन. सध्या आम्ही आणत असलेल्या ‘बॅड न्यूज’चा आनंद घ्या. पण, त्या बातमीची वेळ आली की नक्की सांगेन’, असेही विकीने म्हटले.
धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती झालेल्या बॅड न्यूज चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. आनंद तिवारी यांनी यात अभिनेता म्हणूनही काम केले आहे. बॅड न्यूज हा चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. त्याचा ट्रेलरही लोकांना आवडला आहे. चित्रपटात विकी कौशल शिवाय तृप्ती डिमरी आणि एमी वर्क हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…