Hina khan: अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर, आईचे रडून रडून झाले हाल

मुंबई: बॉलिवूड तसेच टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. तिचा कॅन्सर तिसऱ्या स्टेजवर पोहोचला आहे. कोकिलाबेन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हिना आणि तिच्या कुटुंबियांसाठी हा अतिशय कठीण काळ आहे. यातून बाहेर काढण्यासाठी तिची आई तिला मदत करत आहे. बॉयफ्रेंड रॉकी जायसवालही तिच्यासोबत आहे.

कॅन्सरच्या उपचारादरम्यान चाहत्यांसोबत जोडलेले राहण्यासाठी हिना खान काही ना काही पोस्ट शेअर करत आहे. यावेळेस तिने तिला स्वत:ला धीर दिला आहे.

हिनाने लिहिले, हा कठीण काळ आहे, निघून जाईल. फक्त थोडी हिंमत हवी आहे. काही दिवसांआधी हिना खान एका कार्यक्रमात दिसली होती. रेड कार्पेटवर पाहिल्यावर तिला असे वाटत नव्हते की ती इतक्या कठीण काळातून जात आहे. तिच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात चमक दिसत होती.

हिना खानची ही स्थिती पाहून तिच्या आईचे हाल खराब झाले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. येथे तिच्या आईचे अश्रू थांबत नाही आहेत. हिनाची रुग्णालयात ती काळजी घेत आहे. हिनाचे वडील हॉर्ट अॅटॅकने वारले होते. अनेकदा हिना आपल्या वडिलांची आठवण काढत असते.
Comments
Add Comment

भाईजानचे साठीत पदार्पण! वाढदिवसानिमित्त वांद्रे-वरळी सिलिंक खास रोषणाई

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने साठीमध्ये पदार्पण केले आहे. सलमान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करणार

शॉर्टमध्ये सांगितलेली बेकेट थिअरी

भालचंद्र कुबल, पाचवा वेद हल्ली अँटीसिपेटेड कथानकांचा एवढा कंटाळा आलाय ना की समजा नाटक बघताना तुमच्या बाजूच्या

तरुण तुर्क : तोरडमल ते तोडणकर...

राज चिंचणकर, राजरंग ज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांनी त्यांच्या नाटकांतून भूमिकाही रंगवल्या

'हि-मॅन'ला शेवटचे पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता; नवीन वर्षाची सुरुवातच होणार देशभक्तीने

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र बॉलिवूडचा हि-मॅन कायमच आपल्या

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक