Eknath Shinde : त्यांनी तर अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?

लाडकी बहीणबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार


दादा हे 'वादा'चे पक्के, अर्थसंकल्प सर्वसमावेशक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon session of Legislature) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यामध्ये शेतकरी, दूध उत्पादक, महिलावर्ग, तरुणवर्ग अशा सर्वांसाठी फायद्याच्या अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. शिवाय पेट्रोल, डिझेल यांच्याही किंमती कमी करण्यात येणार आहेत. मात्र यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर टीका केली. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.


'लाडकी बहिण योजना राबवली जात आहे. लाडका भाऊ योजना का नाही?' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडका भाऊ योजना तर आम्ही केली आहे. १० हजार रुपये आम्ही देत आहोत. पण त्यांनी तर अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचं काय? असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दादा हे 'वादा'चे पक्के आहेत. अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आहे. तसेच तीन सिलेंडर वर्षाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे आम्ही देणार आहोत. त्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.



औरंगजेब आणि याकुब मेमन ज्यांचे फादर, त्यांना चादरच दिसणार


चादर फाटली असल्याने सत्ताधाऱ्यांनी खैरात वाटायला सुरुवात केली आहे, अशी टीका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, औरंगजेब आणि याकुब मेमनला मनाने ज्यांनी फादर मानले आहे. त्यांना चादरीशिवाय दुसरे काय दिसणार? अशी टीका त्यांनी यावेळी जयंत पाटलांवर केली.

Comments
Add Comment

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक ते वरळी प्रॉमेनेडला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग प्रस्ताव मंजूर

मुंबईकरांच्या सोयीसाठी सुमारे १ किलोमीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा मार्ग मुंबईच्‍या पर्यटनाला मिळणार मोठी

BM C : मुंबईत धूर फवारणीच्या नगरसेवकांची बोंबाबोंब

धूर फवारणींची मशिन्स पडतात बंद प्रत्येक नगरसेवक प्रभागात एक मशिन्स खरेदीची केली स्थायी समितीत मागणी मुंबई

Vaccinated Stray Dogs : क्यु आर कोड पहा आणि आपला कुत्रा ओळखा

लसीकरण झालेल्या भटक्या श्वानांसाठी क्यूआर कोडयुक्त परावर्तित कॉलर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Crane Accident : मुंबईत मोठा अपघात! कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर क्रेन कोसळली

मुंबई : मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. एमएमआरडीएकडून सुरू

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि

Sanjay Rathod : मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, क्षेत्रीय स्तरावरील उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर