Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : थापांचा नाही तर मायबापांचा, निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प

Devendra Fadnavis : थापांचा नाही तर मायबापांचा, निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon session of Legislature) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यामध्ये शेतकरी, दूध उत्पादक, महिलावर्ग, तरुणवर्ग अशा सर्वांसाठी फायद्याच्या अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. शिवाय पेट्रोल, डिझेल यांच्याही किंमती कमी करण्यात येणार आहेत. मात्र यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील हा अर्थसंकल्प थापांचा आहे, अशी टीका केली. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘थापांचा नाही तर मायबापांचा, निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प’, असं ते म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकरी, महिला, युवा मागासवर्गीय अशा सर्व घटकांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. उद्धव ठाकरे म्हणतात हा थापांचा अर्थसंकल्प आहे. आम्ही म्हणतो की हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेणारा, कापूस सोयाबीन उत्पादकांना मदत करणारा, महिलांसाठी योजना आणणारा, तरुणांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे, असे फडणवीस म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितलं की, विरोधी पक्षाचे लोक इथे बोलत होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता. तो उतरलेला होता. त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता. हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात एक नवा इतिहास तयार करणार आहे. हा अर्थसंकल्प आम्ही पूर्ण करून दाखवू. हा निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. जयंत पाटील किंवा विरोधकांचे नेते बजेटवर काय बोलायचे हे आधीच लिहून आणतात. आम्ही कसाही अर्थसंकल्प मांडला असता तरी ते तेच बोलले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -