सेंगोल हे देशाचे प्रतिक, ते हटवणार नाही; विरोधकांच्या आरोपांना भाजपाचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : सेंगोल हे देशाचे प्रतिक आहे. सेंगोल स्थापन करण्यात आले, ते आता कुणीही हटवू शकत नसल्याचे प्रतिपादन भाजपाचे खासदार महेश जेठमलानी यांनी केले आहे.


नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचा शपथविधीनंतर आणि सभापती निवडीनंतर गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. यानंतर, संसदेत स्थापन करण्यात आलेल्या सेंगोलवरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी संसद भवनातील सभापतींच्या आसनाजवळ लावण्यात आलेला सेंगोल हटवण्याची मागणी केली आहे. सेंगोल हे राजेशाहीचे प्रतीक असल्याचे म्हणत, ते काढून टाकावे आणि त्या जागेवर संविधान स्थापन करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.


समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार आरके चौधरी म्हणाले, आपल्या गेल्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने संसदेत 'सेंगोल' स्थापन केले आहे. ‘सेंगोल’ म्हणजे ‘राजदंड’, याचा अर्थ ‘राजाचा दंड’ असाही होतो. राजेशाही संपवून देश स्वतंत्र झाला. देश 'राजाच्या दंडा'ने चालणार की संविधानाने? संविधान वाचवण्यासाठी संसदेतून सेंगोल हटविले जावे.


आरके चौधरी यांच्या विधानावर बोलताना समाजवादी पक्षाचे प्रमुख तथा खासदार अखिलेश यादव म्हणाले, जेव्हा सेंगोल स्थापन करण्यात आला तेव्हा पंतप्रधान त्याच्यासमोर नतमस्तक झाले होते.


या मुद्यावर काँग्रेस आणि आरजेडीनेही समाजवादी पक्षाचे समर्थन केले आहे. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी, आरजेडी नेत्या मीसा भारती यांनीही सेंगोल हटवण्याची मागणी केली.


आर के चौधरी यांच्या वक्तव्यावर भाजपचे लोकसभा खासदार खगेन मुर्मू म्हणालेकी, विरोधी पक्षाच्या लोकांना दुसरे काही काम नाही. यांनी संविधानाच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज पसरवला. हे लोक संविधानाला मानत नाहीत. उलट मोदीजी संविधानाला अधिक सन्मान देतात. केंद्रीय मंत्री जयंत चौधरी म्हणाले की, ही लोक अशीच सर्व कामे करतात. हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. हे लोक प्रसिद्धीसाठी असे बोलतात. आपण सर्वच जण संविधानाला मानतो. एकट्या समाजवादी पक्षाने संविधानाचा ठेका घेतलेला नाही.

Comments
Add Comment

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' चा वर्ल्ड रेकॉर्ड!

पंतप्रधान मोदींकडून महिला-केंद्रित आरोग्य अभियानाचे कौतुक नवी दिल्ली: 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' (Swasth Nari,

सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची