दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास


इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या इंदूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर या दूषित पाण्यामुळे ११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास होत आहे. इंदूर शहरामध्ये नर्मदा नदीमधून येणारे पाणी हे आजार आणि मृत्यूचे कारण ठरत असल्याचे समोर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने प्रभावित भागातील पाणीपुरवठा बंद केला आहे. जलवाहिनीची दुरुस्ती केली जात असून, टँकरमधून स्वच्छ पाणी पुरवले जात आहे. आरोग्य विभागाची पथके घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करत आहे.


दूषित पाणीपुरवठ्यामुळे ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने त्वरित तपास सुरू केला. त्यानंतर भागिरथपुरा पोलीस चौकीच्या टॉयलेटखालून जाणाऱ्या नर्मदेच्या जलवाहिनीला गळती लागली होती. या गळतीमुळे दूषित पाणी जलवाहिनीमध्ये मिसळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण प्रभागात दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. हे दूषित पाणी पिऊन लोक आजारी पडत होते. दूषित पाण्याचे प्राशन केल्याने तब्येत बिघडून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याने इंदूरमधील भागिरथपूरामध्ये खळबळ उडाली आहे.


गेल्या काही दिवसांपासून नर्मदा नदीच्या पाण्याचा वापर करू नका, असे आवाहन करणाऱ्या पोस्ट येथील सोशल मीडियावरून लोक शेअर करत होते. मात्र लोकांच्या तक्रारींकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले.

Comments
Add Comment

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात

UGC : अमली पदार्थविरोधी अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)

Cough Syrup Warning For Kids : लहान मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी

नवी दिल्ली : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी-खोकल्यावरील

BRICS : ब्रिक्स प्लस देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी 'न्यायनॉमिक्स' अन् 'न्याय सेतू'

नवी दिल्ली :  ११ व्या ‘ब्रिक्स प्लस लिगल फोरम’च्या उद्घाटनाप्रसंगी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत

LPG Pipeline : देशातील सहा राज्यांमध्ये LPG पाइपलाइनचा विस्तार, केंद्राकडून ७ हजार कोटींची गुंतवणूक आणि १,८०० किमी नव्या पाइपलाइनला मंजुरी

नवी दिल्ली : देशातील एलपीजी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.