Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीGovernment Job : परीक्षा न देताच मिळवा सरकारी नोकरी! 'या' विभागात मेगाभरती

Government Job : परीक्षा न देताच मिळवा सरकारी नोकरी! ‘या’ विभागात मेगाभरती

मुंबई : अनेक तरुण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. मात्र सरकारी नोकरीसाठी (Government Job) भरावे लागणारे फॉर्म व परीक्षा देण्यासाठी बहुतेकजण कंटाळा करतात. अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोणतीही परीक्षा न देताच तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (NMDC) शिकाऊ उमेदवारांसाठी मेगाभरती जारी केली आहे. ही भरती मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला याबाबत परीक्षा द्यावी लागणार नाही. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.

‘या’ पदांसाठी भरती

एनएमडीसीमध्ये इच्छुक उमेदवारांसाठी १ जुलैपासून मुलाखतीचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये ट्रेड अपरेंटिस, स्नातक अपरेंटिस आणि तंत्रज्ञ अपरेंटिससाठी रिक्त पदांचा समावेश असणार आहे.

काय आहे शैक्षणिक पात्रता?

ITI शिकाऊ उमेदवारांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे NVCT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त आयआयटीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तर ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय टेक्निशियम डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी उमेवाराकडे सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

असा करा अर्ज

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावर केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना NAOS पोर्टलवर स्वतः ला रजिस्टर करावे लागेल. यासाठी त्यांना www.apprenticeshipindia.gov.in साइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी अर्जदारांना किमान १ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

मुलाखतीचे वेळापत्रक आणि ठिकाण

NMDC Ltd बैलाडीला लोह खनिज खाण, किरंदुल कॉम्प्लेक्स येथे विविध शिकाऊ पदांसाठी मुलाखती घेईल.

  • ट्रेड अप्रेंटिस मुलाखती: १, २, ४, ५ आणि ६ जुलै २०२४
  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस मुलाखती: ७ आणि ८ जुलै २०२४
  • तंत्रज्ञ डिप्लोमा अप्रेंटिस मुलाखती: ९ जुलै २०२४

भरती तपशील

या भरती मोहिमेचे उद्दिष्ट एकूण १९७ पदे भरण्याचे आहे-

  • ट्रेड अप्रेंटिस: १४७ पदे
  • पदवीधर प्रशिक्षणार्थी: ४० पदे
  • डिप्लोमा अप्रेंटिस: १० पदे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -