Navneet Rana : असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा!

नवनीत राणा यांची राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी; काय आहे कारण?


मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर २४ व २५ जून रोजी पार पडलेला खासदारांचा शपथविधी सोहळा हा चर्चेचा विषय ठरला. महाराष्ट्रातील काही खासदारांनी मराठीत शपथ घेतली, काहींनी हिंदीत तर निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी घेतलली इंग्रजी शपथही बरीच चर्चेत आली. परंतु या सगळ्यात हैदराबादचे खासदार म्हणून निवडून आलेल्या एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisee) यांची शपथ वादाचा मुद्दा ठरली. त्यांच्या एका कृतीमुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्यातच माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) देखील आक्रमक झाल्या आहेत. नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ओवैसींची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.


लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी असदुद्दीन ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यादरम्यान त्यांनी संसदेत शपथ घेताना जय पॅलेस्टाईनची घोषणा दिली, त्यामुळे वाद निर्माण झाला. प्रोटेम स्पीकर यांनी असदुद्दीन ओवैसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावले. बिस्मिल्लाचे पठण करून ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी 'जय भीम, जय तेलंगणा' आणि नंतर 'जय पॅलेस्टाईन'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला होता. तर, सोशल मीडियातूनही त्यांच्या या शपथेवर टीका करण्यात आली.


याच प्रकरणी आता नवनीत राणा यांनीही कडक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून राणा यांनी असदुद्दीन ओवैसींनी जय पॅलेस्टाईन म्हणत केलेल्या घोषणेवर आक्षेप घेतला आहे. भारतीय संविधानाच्या कलम १०२/१०३ नुसार असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, असे त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ओवैसी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेताना, जय पॅलेस्टाईनचा नारा देत आपली शपथ पूर्ण केली होती. त्यामुळे, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाब असून त्यांनी शपथ घेताना भारतीय संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप राणा यांनी पत्रातून केला आहे.


Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या