नवी मुंबई : कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक २६ जून रोजी कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ६४.१४ टक्के मतदान झाले. मतदार यादीनुसार कोकण विभागामध्ये १ लाख २७ हजार ७६९ पुरुष, ९५ हजार ६३९ स्त्री मतदार असे एकूण २ लाख २३ हजार ४०८ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी ८४ हजार ६६५ पुरुष,५८ हजार ६३२ स्त्री असे एकूण १ लाख ४३ हजार २९७ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदार यादीनुसार ७१ हजार १० पुरुष तर ४९ हजार ७६१ स्त्री मतदार असे एकूण १ लाख २० हजार ७७१ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी ८४ हजार ६६५ पुरुष तर २६ हजार ६०२ स्त्री असे एकूण ७६ हजार ६४६ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदार यादीनुसार ३ हजार ९५३ पुरुष तर ११ हजार ८८६ स्त्री मतदार असे एकूण १५ हजार ८३९ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी ३ हजार १३० पुरुष तर ८ हजार ८७२ स्त्री असे एकूण १२ हजार ०२ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मत मोजणी सोमवार दि. १ जुलै २०२४ रोजी आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर-२४, नेरुळ (पश्चिम), नवीमुंबई येथे होणार आहे.
मुंबई विमानतळावर १ हजाराहून अधिक पदांची मेगाभरती; 'असा' करा अर्ज मुंबई : अनेक तरुणांचे हवाई…
पर्यटक वाहून जाण्याच्या घटनांनंतर सर्वच ठिकाणचे जिल्हाप्रशासन अलर्ट मोडवर ठाणे : गेल्या काही दिवसांत पावसाळी…
हायकोर्टाकडूनही अखेर दिलासा नाहीच नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यात (Nagpur Bank scam) आरोपी…
लॉज आणि पोलिसांच्या जीपमध्ये लपून बसलेल्या महिलांचा उधळला डाव मध्यरात्री केले उग्र स्वरूपाचे आंदोलन कोल्हापूर…
भोलेबाबा बनण्याआधी होता उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल १२१ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? लखनऊ : उत्तर…
'या' खास कारणासाठी येणार मुंबईत मुंबई : सध्या देशभरात आगामी विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) वारे…