Sunday, May 11, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Video: सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी रात्रभर केले सेलिब्रेशन

Video: सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी रात्रभर केले सेलिब्रेशन

मुंबई: अफगाणिस्तानच्या संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले आहे. संघाने सेमीफायनलमध्ये पोहोचताच सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. संघातील खेळाडू खुश असण्यासोबतच भावूकही दिसत होते.


आता स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना २७ जूनला भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजल्यापासून दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार आहे. हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळवला जाईल. माज्ञ त्याच्याआधी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा व्हिडिओ आहे. या अफगाणी खेळाडू संपूर्ण रात्र झोपले नाहीत आणि त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले.


आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला यात अफगाणिस्तानचा संघ सेमीफायनलसाठी त्रिनिदादमध्ये पोहोचत आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार रशीद खान म्हणतो आम्ही संपूर्ण रात्रभर जागे होतो. आम्ही अफगाणिस्तानातील लोकांसोबत मोठे सेलीब्रेशन केले. तिथे दिवस होता. ते सेलीब्रेशन करत होते आणि आम्हीही सेलीब्रेशन करत होतो.


संघाचा वेगवान गोलंदाज फजलहक फारूकी आणि विकेटकीपर फलंदाज रहमानुल्लाह गुरबाजने सांगितले की त्यांना खूप झोप येत आहे. गुरबाजने सांगितले की हॉटेल पोहोचल्यावर ते काही खाणे ऑर्डर करतील आणि झोपतील. उद्या सेमीफायनलसाठी उठतील. यानंतर रशीद खान त्याचे आवडते गाणे लावतो. या गाण्याचा आनंद इतर खेळाडूंनीही घेतला.






 










View this post on Instagram























 

A post shared by ICC (@icc)





पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचला अफगाणिस्तानचा संघ


अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदा एखाद्या वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. संघाने २०१०पासून वर्ल्डकप खेळण्यास सुरूवात केली होती. अफगाणिस्तानच्यासंघाला टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये खेळण्यासाठी १४ वर्षे वाट पाहावी लागली. संघाने २०२४च्या या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत शानदार खेळ केला आहे. अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजमध्ये सलग ३ सामने जिंकले आणि सुपर ८साठी क्वालिफाय केले. तीन सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने युगांडा, न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनीला हरवले आणि सुपर ८साठी क्वालिफाय केले. त्यांना ग्रुप स्टेजमध्ये वेस्ट इंडिजकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर सुपर ८मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशला हरवले.

Comments
Add Comment