महाविद्यालय प्रशासनाने घातलेली बुरखाबंदी योग्यच

Share

नऊ विद्यार्थिनींची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरातील महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींना हिजाब आणि बुरखा परिधान करण्यास घातलेल्या बंदी विरोधात ९ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली आहे. न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर व राजेश न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. महाविद्यालयाने लादलेल्या या बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत खंडपीठाने ही याचिका निकाली काढली.

महाविद्यालयामधील हिजाब बंदीच्या विरोधातील याचिकेवर १९ जून रोजी सुनावणी झाली होती. चेंबूर येथील चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन. जी. आचार्य व डी. के. मराठे महाविद्यालय प्रशासनाने मे महिन्यात विद्यार्थिनींना व्हॉटसअपद्वारे संदेश पाठवून कॉलेजमध्ये बुरखा, हिजाब व नकाब परिधान करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे या विद्यार्थिनींनी आपल्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे नमूद करत वकील अल्ताफ खान यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींच्या व्हॉट्सअप ग्रु वर एक संदेश पाठवून हिजाब, बुरखा, नकाब, टोपी, दुपट्टा, ओढणी याच्यावर ड्रेस कोड लागू करून प्रतिबंध घातला आहे. त्यानंतर महाविद्यालयातील द्वितीय आणि तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा प्रकार म्हणजे केवळ सत्तेचा दुरुपयोग असून अन्य काही त्यामध्ये नाही, असा आरोप त्यांनी केला होता. हिजाब, नकाब व बुरखा हा आमच्या धार्मिक आस्थेचा, श्रद्धेचा विषय आहे. त्यावर बंदी लागणे हा आमच्या मूलभूत अधिकारावर हल्ला असल्याचे मत या विद्यार्थिनींनी व्यक्त केले. त्यामुळे उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेऊन कॉलेज प्रशासनाच्या या तुघलकी निर्णयाला रद्द करावे, अशी मागणी विद्यार्थिनींनी याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाकडे केली होती. आमचा हिजाब, नकाब, बुरखा परिधान न करण्याचा आदेश म्हणजे मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याचे विद्यार्थिनीने याचिकेत म्हटले. महाविद्यालयात समान ड्रेस कोड लागू करण्याचा हेतू असल्याचे स्पष्टीकरण महाविद्यालयातर्फे बाजू मांडताना देण्यात आले होते.

महाविद्यालयाने हिजाब, नकाब, बुरखा, टोपी परिधान करण्यावर बंदी घातली आहे. महाविद्यालयाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी याला आक्षेप घेत याचिका दाखल केली. महाविद्यालयाच्या या निर्णयामुळे आमच्या मूलभूत, धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचा आणि खासगीपणा धोक्यात येत असल्याचा आक्षेप विद्यार्थिनींनी घेतला होता. परंतु हिजाब घालणे ही धार्मिक अत्यावश्यक बाब असल्याचे कोणत्या धार्मिक प्रमुखांनी सांगितले? असा प्रश्न खंडपीठाने यावेळी याचिकाकर्त्या वकिलांना विचारला होता.

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

27 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago