Open Library : पालिकेच्या नानालाल मेहता उद्यानात ‘मुक्त ग्रंथालय’

Share

नागरिक आणि विद्यार्थ्यांना वाचनासाठी नि:शुल्क पुस्तके उपलब्ध

मुंबई : पालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या वतीने नानालाल डी. मेहता पुलाखालील मोकळ्या जागेत नि:शुल्क ‘मुक्त ग्रंथालय’ सुरू करण्यात आले आहे. या सुविधे अंतर्गत नागरिक तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाचनासाठी नि:शुल्क पुस्तके उपलब्ध असतील.

सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांच्या हस्ते या ग्रंथालयाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी गबुला फाऊंडेशन, इनरव्हील संस्था यांचे प्रतिनिधी, नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या वतीने २०१६ मध्ये नानालाल डी. मेहता उद्यान हे नर्मदा परिक्रमेच्या धर्तीवर विकसित करण्यात आले आहे. एखाद्या पुलाखालील जागेवर तयार करण्यात आलेले हे मुंबईतील पहिले उद्यान आहे. सुमारे ६ हजार ३४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या उद्यानामध्ये नागरिकांसाठी ९०० मीटर लांबीचा पदपथ, योगाभ्यास आणि बसण्यासाठी विशिष्ट आसनव्यवस्था तसेच आसपास शोभिवंत झाडे लावण्यात आलेली आहेत. यासोबतच आता या ठिकाणी नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क ‘मुक्त ग्रंथालय’ सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयामध्ये विविध साहित्य विषयक पुस्तके, महापुरुषांची आत्मचरित्रे, सामान्य ज्ञान, खेळ आदी विषयांवर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहेत.

सद्यस्थितीत या ठिकाणी एकूण १३२ पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. नागरिक ही पुस्तके कपाटातून घेऊन तिथेच बसून वाचू शकतात. हे ग्रंथालय सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

विरंगुळा आणि करमणुकीसोबतच ज्ञानार्जन आणि वाचनाची सवय वृद्धींगत होण्याच्या अनुषंगाने नानालाल डी. मेहता उद्यानात हे ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Tags: Open Library

Recent Posts

Rahul Dravid : वर्ल्डकप जिंकल्यानंतर कोच राहुल द्रविड यांची विराट कोहलीकडे ‘ही’ खास मागणी!

म्हणाले, तू सर्व आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफी तर जिंकल्यास, पण... मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने…

33 mins ago

Nashik news : नाशिक शिक्षक मतदार संघाची मतमोजणी थांबवली! काय आहे कारण?

नाशिक : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. एकाच मतपेटीत तब्बल ३ मतपत्रिका…

1 hour ago

Yavatmal Accident : यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चार जण ठार

इनोव्हा कार ट्रकला धडकल्याने झाला अपघात  यवतमाळ : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ…

1 hour ago

Ravindra Jadeja : रोहित-विराटनंतर रविंद्र जडेजानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…

18 hours ago

Lonavla news: भुशी डॅममागील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले!

पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…

19 hours ago

Belapur News : बेलापूर गावात भाजपाचा विकास कामाचा पाहणी दौरा!

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…

19 hours ago