मुंबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) पहिला सेमीफायनल सामना २७ जूनला सकाळी ६ वाजता अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात २७ जूनला रात्री ८ वाजता गयानामध्ये खेळवला जाईल.
अशातच सवाल हा आहे की जर या सेमीफायनलमध्ये पाऊस आला आणि खराब हवामानामुळे सामना रद्द झाला तर अखेर फायनलमध्ये कोण खेळेल?
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी ४ तास १० मिनिटांचा एक्स्ट्रा वेळ ठेवण्यात आला आहे. येथे कोणताही रिझर्व्ह डे नाही.
जर पावसामुळे सामना रद्द झाला तर सुपर ८मध्ये टॉपमधील संघ फायनलमध्ये पोहोचेल. म्हणजेच सेमीफायनलचा कोणताही निकाल समोर आला नाही तर ग्रुप १मध्ये टॉपवर राहणारा भारत आणि ग्रुप २मध्ये टॉपवर राहणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये खेळतील.
पहिल्या सेमीफायनलमध्ये दिवसाच्या खेळाच्या शेवटी अतिरिक्त ६० मिनिटे आणि रिझर्व्ह डेला १९० मिनिटे असतील. तर रिझर्व्ह डेला खेळ तिथूनच सुरू होईल जिथे संपला होता.
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…