Pune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणी अनधिकृत पब्ज आणि बारवर फिरवला हातोडा!

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे पालिका खडबडून जागी


पुणे : रोज घडत असलेल्या चित्रविचित्र गुन्हेगारी घटनांमुळे विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याला कलंक (Pune crime) लागला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी पुण्यातून ड्रग्ज पार्टी प्रकरण (Pune Drugs Case) समोर आलं. यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशानंतर पुणे महानगर पालिकेला (Pune Municipal Corporation) खडबडून जाग आली आहे. पुणे पालिका अॅक्शन मोडमध्ये आली असून एफसी रोडवरील (FC road) अनधिकृत पब, बारवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. या पब आणि बार समोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी फर्ग्युसन रोडवर दाखल झाले आहेत. या ठिकाणी अनेक हॉटेल चालकांनी अनधिकृत बांधकाम केलं आहे त्यावर कारवाई केली जात आहे. या ठिकाणी असणाऱ्या अनेक हॉटेल, पब आणि बारला नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. मात्र तरीही अनेक हॉटेल चालकांनी अनधिकृत बांधकाम केलं आहे, त्यामुळे महापालिका आक्रमक होऊन आता कारवाई करत आहे. अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारी अधिकाऱ्यांनी हातोडा फिरवण्यास सुरूवात केली आहे.



'त्या' पबवरही होणार कारवाई


पुण्यातील कथित ड्रग्सचे सेवन करणारे २ तरुण ज्या बारमध्ये दिसले होते, त्या L3 बारवरही कारवाई होणार आहे. या पबबाहेर अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी पोहोचले असून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याची शक्यता आहे. तर ड्रग्सचे सेवन करणाऱ्या २ तरुणांपैकी एका तरुणाला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. नितीन आणि करण अशी या तरुणांची नावं आहेत.


दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. दोघे ही तरुण मित्र असून २४ ते २५ वर्षे वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मध्यरात्री १.३० वाजता या तरुणांनी L3 बारमध्ये एन्ट्री केली होती अशी माहिती आहे.



नेमकं काय घडलं होतं?


पुण्यातील एफसी रोडवर L3 बारमध्ये येण्याआधी ४० ते ५० तरुणांनी हडपसरमधील एका नामांकित पबमध्ये रात्री १२ वाजेपर्यंत पार्टी केली होती. आणखी पार्टी करण्यासाठी या तरुणांनी L3 बार गाठले होते. हडपसर भागात असलेल्या त्या पबचे सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केले आहे. हडपसरमधील पार्टी झाल्यानंतर ५० तरुण L3 बारमध्ये पोहचले होते.



L3 बारच्या मालकांनी दिली धमकी


दरम्यान, L3 बारच्या मालकांनी यासंबंधी कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. मागील ४० वर्षांत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काही वावगं आढळलं नाही, मग आताच का कारवाई केली? असा सवाल बारच्या मालकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय वळणं येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक