Grampanchayat protest : ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने विधानभवनावर आक्रोश मोर्चा

  178

बच्चू कडू करणार नेतृत्व; काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?


ठाणे : कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत असलेल्या अनेक समस्या तसेच भरती प्रक्रिया अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या (Maharashtra Gram Panchayat Employee Union) वतीने विधानभवनावर (Vidhanbhavan) आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील २७ हजार ९२० ग्रामपंचायती मधील ६० हजार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शुक्रवार, २८ जून रोजी हा मोर्चा काढणार असल्याची माहिती कर्मचारी युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांनी भिवंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष आमदार बच्चू कडू या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.



काय आहेत कर्मचारी संघटनेच्या मागण्या?



  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी.

  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे.

  • किमान वेतनाच्या अनुदानाची १९ महिन्यांची थकीत रक्कम तात्काळ मिळावी.

  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करावी. ग्रामपंचायत

  • कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी.

  • ग्रामपंचायत कर्मचारी दहा टक्के आरक्षणानुसार भरती करत असताना दरवर्षीच्या रिक्त पदावर अनुकंपाचे धरतीवर करावी.


महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्या या अद्याप प्रलंबित आहेत. युनियनच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी केलेल्या आंदोलन प्रसंगी शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे असं संघटनेचं म्हणणं आहे. यानंतरही आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आंदोलन अधिक उग्र करीत मुंबई येथे आमरण उपोषण सुरू करून राज्यातील ग्रामपंचायती कर्मचारी बेमुदत संप पुकारतील असा इशारा दत्तात्रय भोईर यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची