Accident news : ट्रकवरील सामानाची दोरी सुटली आणि लोखंड थेट पादचाऱ्याच्या डोक्यात पडलं!

भीषण दुर्घटनेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू


मुंबई : गेल्या काही दिवसांत अपघात व दुर्घटनांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरातून आणखी एक धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे. एका मालवाहू ट्रकवर बांधलेल्या लोखंडी सामानाची दोरी सुटली आणि त्यातील लोखंड रस्त्याच्या कडेने फुटपाथवर चाललेल्या एका पादचाऱ्याच्या डोक्यात पडलं. यामध्ये पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विजय असराणी (वय ४०) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित ट्रक हा रविवारी रात्री लोखंडी साहित्य घेऊन मुंबई कोस्टल रोडच्या कामासाठी निघाला होता. हा ट्रक वांद्रे येथील टर्नर रोड (Turner Road) परिसरात आला तेव्हा झाडाच्या एका खाली आलेल्या फांदीला वाहन घासले गेले. त्यामुळे ट्रकवर बांधलेली दोरी अचानक तुटली. यावेळी विजय असराणी हे शेजारच्या फुटपाथवरुन चालत होते. ट्रकची दोरी तुटल्यानंतर त्यामधील लोखंडी साहित्य आणि लोखंडाचे भाग सुटे झाले. यापैकी एक लोखंडी भाग रस्त्यावरुन चालत असलेल्या विजय असराणी यांच्या अंगावर पडला.


विजय असराणी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आजुबाजूच्या लोकांनी विजय असराणी यांना तातडीने भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या अपघातप्रकरणात ट्रक चालक आलम अन्सारी याला अटक केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News: सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल; रिलस्टार रणदीप गुजराल अटकेत

मुंबई : मुलुंड (Mulund) परिसरातील एका व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या रणदीप हरबिंदरसिंग गुजराल (वय 40) या

Bhiwandi News: भिवंडीत हृदयद्रावक घटना! सेप्टिक टँकचे झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरातील फरीद बाग परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इमारतीच्या

Mumbai Mayor Accident : मुंबईच्या महापौर रितु तावडे यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) महापौर रितु तावडे (Mayor Ritu Tawde) यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात (Sion Bridge Accident) झाल्याची घटना सोमवारी

Byculla BMC School : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे गौरवोद्गार

- भायखळा येथील महानगरपालिका शाळेत पार पडला प्रवेशोत्सव सोहळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) शाळा ही केवळ शिक्षण

DCM Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

मुंबईत शुन्य जीवितहानी उद्दीत ठेवा मुंबई महापालिकेसह सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे दिले

Goregaon Motilal Nagar Redevelopment Project : गोरेगाव मोतीलाल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पात २२० झाडे बाधित

- पालघरमधील चहाडे गावात लावणार ४००६ झाडे लावणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगरमधील