Sharad Pawar Group : विधानसभा निवडणुकीत 'पिपाणी' चिन्ह यादीतून वगळा!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर मूळ चिन्ह 'घड्याळ' हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला मिळालं तर शरद पवार (Sharad Pawar) यांना निवडणूक आयोगाने (Election Commission) 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह दिलं. या चिन्हबदलामुळे शरद पवार गटाची मतं घटतील, असा अंदाज होता. मात्र, शरद पवारांनी १० जागा लढवून त्यातील ८ जागा जिंकत मोठा विजय मिळवला.


त्याच दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) यादीत असलेल्या 'पिपाणी' या चिन्हामुळे शरद पवार गटाला साताऱ्याच्या जागेवर फटका बसला. तसेच जिंकलेल्या ठिकाणीही मताधिक्य काही प्रमाणात कमी झाले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत (VidhanSabha Election) हा धोका नको, म्हणून शरद पवार गटाने 'पिपाणी' चिन्ह यादीतून वगळावे, अशी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.


तुतारी आणि पिपाणी चिन्हे सारखी असल्यामुळे शरद पवार यांच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. तसेच राष्ट्रवादीची सातारा लोकसभेची सीटही चिन्हाच्या घोळामुळे गमवावी लागली, असा दावा शरद पवार गटाने केला होता. यामुळेच त्यांनी पिपाणीविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं अशा मागणीचे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे.



मागणी मान्य न झाल्यास सुप्रीम कोर्टात जाणार


सातारा लोकसभेत पिपाणीच्या चिन्हाचा घोळ झाल्यामुळे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत पाटील यांचा निसटता पराभव झाला. याठिकाणी पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला तब्बल ३७ हजार मते मिळाली. तसेच दिंडोरीमध्येही पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल १ लाख मते मिळाली होती. यामुळेच विधानसभेच्या बाबतीत शरद पवार गटाने सावध पावित्रा घेतला असून त्यांच्या मागणीबाबत निवडणूक आयोगाने योग्य निर्णय न घेतल्यास ते सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.


Comments
Add Comment

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय

Akola ZP : अकोला शिक्षक बदली प्रकरणात मोठी कारवाई; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली

अकोला : अकोला (Akola) जिल्हा परिषद शिक्षण विभागातील आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक