IND vs AUS: आता ऑस्ट्रेलियाकडून वनडे वर्ल्डकपचा बदला घेणार भारत, कांगारूंना टी-२० वर्ल्डकपमधून करणार बाहेर?

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) सोमवारी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो वा मरो असा आहे. जर या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर सेमीफायनलमध्ये जाण्याच्या त्यांच्या आशा फारच कमी होतील. तर टीम इंडियाकडे कांगारूंकडून २०२३मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.



या पद्धतीने ऑस्ट्रेलिया होणार बाहेर


जर रोहित ब्रिगेडने सोमवारी ऑस्ट्रेलियाला हरवले आणि अफगाणिस्तानने सुपर ८मधील आपला शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध जिंकला तर ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाद होतील. कागारूंनी २०२३वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला हरवले होते. अशातच टीम इंडियाकडे या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.



पाऊस बनू शकतो व्हिलन


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट आहे. दोन्ही संघादरम्यानचा सामना सेंट ल्युसिया येथे खेळवला जाणार आहे. रविवारी येथे जोरदार पाऊस झाला. सोमवारीही येथे पावसाची शक्यता आह. जर हा सामना पावसाने धुतला गेला तर ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसू शकतो.

Comments
Add Comment

Team India Zimbhave Tour : भारताचा युके दौरा संपला;आता झिम्बाब्वेविरुद्धचे पुढचे सामने कधी ?

मुंबई : इंग्लंड दौऱ्यात निराशाजनक कामगिरीनंतर भारतासमोर आता झिम्बाब्वेविरुद्ध पुनरागमन करण्याची संधी आहे.

PV Sindhu : चायना ओपनमध्ये पीव्ही सिंधूकडे भारताचे नेतृत्व; सात्विक आणि चिरागची दुखापतीमुळे माघार

नवी दिल्ली : जपान ओपन सुपर ७५० विजेतेपद जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेली भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही

Mansukh Mandaviya : भारतात १५ जुलैपर्यंत डोपिंगची ७८ प्रकरणे; केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवियांची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : देशातील क्रीडा क्षेत्राशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. केंद्रीय

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनकडून पराभवानंतर अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक भावुक! पत्रकार परिषदेत दाटला कंठ, अश्रू अनावर होताच...

न्यू जर्सी : फिफा विश्वचषकातील सर्वात चर्चित सामन्यांपैकी एक ठरलेल्या स्पेनविरुद्धच्या पराभवानंतर

Rohit Sharma : 'निवृत्तीच्या चर्चा सुरु राहिल्या नाहीत तर...' हिटमॅनने एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्याबाबत सोडले मौन! VIDEO चर्चेत

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा ऐतिहासिक विजय आणि एका नव्या युगाचा उदय!

फुटबॉल इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा महासंग्राम मानला गेलेला फिफा विश्वचषक २०२६ अत्यंत रोमांचक वातावरणात