IND vs AUS: आता ऑस्ट्रेलियाकडून वनडे वर्ल्डकपचा बदला घेणार भारत, कांगारूंना टी-२० वर्ल्डकपमधून करणार बाहेर?

  59

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) सोमवारी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो वा मरो असा आहे. जर या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर सेमीफायनलमध्ये जाण्याच्या त्यांच्या आशा फारच कमी होतील. तर टीम इंडियाकडे कांगारूंकडून २०२३मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.



या पद्धतीने ऑस्ट्रेलिया होणार बाहेर


जर रोहित ब्रिगेडने सोमवारी ऑस्ट्रेलियाला हरवले आणि अफगाणिस्तानने सुपर ८मधील आपला शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध जिंकला तर ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाद होतील. कागारूंनी २०२३वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला हरवले होते. अशातच टीम इंडियाकडे या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.



पाऊस बनू शकतो व्हिलन


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट आहे. दोन्ही संघादरम्यानचा सामना सेंट ल्युसिया येथे खेळवला जाणार आहे. रविवारी येथे जोरदार पाऊस झाला. सोमवारीही येथे पावसाची शक्यता आह. जर हा सामना पावसाने धुतला गेला तर ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसू शकतो.

Comments
Add Comment

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे