Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीPune Accident : पुण्यात एसटी झाडावर आदळल्याने भीषण अपघात! ३० प्रवासी जखमी

Pune Accident : पुण्यात एसटी झाडावर आदळल्याने भीषण अपघात! ३० प्रवासी जखमी

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस अपघाताच्या (Pune Accident) घटना वाढत चालल्या आहेत. आज मध्यरात्रीच एका कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली. यात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक भीषण अपघात झाला आहे. यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धावत असलेली एसटी बसच (ST Bus) झाडावर आदळली (Bus Accident). यामुळे बसमधील ३० प्रवासी जखमी झाले आहेत, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहे. पुण्यातील दौंड तालुक्यात असलेल्या यवतजवळ आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जात असलेली बस झाडावर आदळल्याने अपघात झाला. पुणे-सोलापूर रस्त्यावर यवतजवळ झालेल्या या अपघातात जवळपास ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळील रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. अपघात झालेली ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील जयवतजवळ असलेल्या सहजपुर गावाच्या हद्दीत या बसला अपघात झाला‌.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात मदत केली. या अपघातानंतर जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. झाडावर आदळलेल्या बसचा फोटो पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता लक्षात येते. यात एसटी बसच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -