Tuesday, May 13, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

T-20 world cup 2024: शाकिब अल हसनने रचला इतिहास, टी-२० वर्ल्डकपमध्ये असे करणारा ठरला पहिला गोलंदाज

T-20 world cup 2024: शाकिब अल हसनने रचला इतिहास, टी-२० वर्ल्डकपमध्ये असे करणारा ठरला पहिला गोलंदाज

मुंबई: भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये खेळलेले सर्व सामने जिंकले आहे. सलग ४ सामन्यांत विजय मिळवताना भारताने सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले आहे. शनिवारी बांगलादेशला टीम इंडियाने एकतर्फी सामन्यात हरवले होते. बांगलादेशने भले हा सामना गमावला असला तरी संघाच्या वरिष्ठ खेळाडू शाकिब अल हसनने इतिहास रचला. त्याच्याआधी कोणत्याच खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही.


खरंतर, शाकिब अल हसन टी-२० वर्ल्डकपमध्ये ५० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ५०वा बळी रोहित शर्माचा घेतला. तो टी-२० वर्ल्डकपमध्ये ५० विकेट घेणारा एकमेव गोलंदाज आहे. शाकिब अल हसनने भारताविरुद्ध ३ ओव्हर गोलंदाजी केली मात्र तो महागडा ठरला. शाकिबने ३ षटके बॉलिंग करताना १२.३० इकॉनॉमीने धावा केल्या आणि केवळ एक विकेट घेतला. ५० विकेट मिळवण्यासाठी त्याला ४२ सामन्यांची गरज पडली.


टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या ५ गोलंदांजांबाबत बोलायचे झाल्यास पहिल्या स्थानावर शाकिब अल हसन आहे. यानंतर शाहीद आफ्रिदी, लसिथ मलिंगा, वानिंदु हसरंगा आणि अॅडम झाम्पा यासारखे खेळाडू आहेत. या यादीत कोणताही भारतीय गोलंदाज नाही. या गोलंदाजांनी अनुक्रमे ३९,३८,३७ आणि ३६ विकेट आपल्या नावे केले आहेत.


या यादीतील दोन खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. शाहिद आफ्रिदी आणि लसिथ मलिंगा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. तर शाकिब अल हसन, वानिंगु हसरंगा आणि अॅडम झाम्पा हे अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत.

Comments
Add Comment