मुंबई : मुंबईसह राज्यात साधारण १५ लाख रिक्षा चालक-मालक स्वयंरोजगारित आहेत. रिक्षाच्या भाड्याचे दर, रिक्षा संचालनासंदर्भातील सर्व अटी व शर्ती राज्य सरकार (State Government) ठरवते. मात्र कोरोना काळानंतर रिक्षाचालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. यामुळे राज्यातील रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा हाती घेत उद्या राज्यभर आंदोलन (Rickshaw Drivers Agitation) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा संचालनासंदर्भात सर्व गोष्टी सरकारकडून ठरवल्या जातात. रिक्षाचालकांना कोरोनाकाळात केवळ १५०० रुपयांच्या मदतीशिवाय अन्य कोणतीही मदत सरकारने केली नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकांना मोठ्या आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे. अशातच वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या तारखेपासून ५० रुपये प्रतिदिवस या प्रमाणे रिक्षाचालकांवर विलंब शुल्क आकारण्यात येत आहे. यामुळे रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली उद्या (सोमवारी) राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे.
या दिवशी स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ज्या ठिकाणी कार्यालय नसतील त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततामय आंदोलन करण्यात येणार आहे, असे संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…