Beed news : बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या कारसमोर मुंडे समर्थक आक्रमक!

  100

घोषणाबाजी करत क्षीरसागर यांना गावातून बाहेर काढले


बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट व शरद पवार गट समोरासमोर आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आज बीडमध्ये अशीच एक घटना घडली ज्यात अजित पवार गटाचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे समर्थक (Beed Munde Activist) आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांची कार येताच मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांना गावातून बाहेर काढले. हिंगणी (खुर्द) गावामध्ये ही घटना घडली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संदीप क्षीरसागर यांना मुंडे समर्थकांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला. बीडच्या हिंगणी (खुर्द) गावात संदीप क्षीरसागर यांची कार येताच मुंडे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी गेली. 'पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है!', 'महाराष्ट्राचा एकच ढाण्या वाघ धनंजय मुंडे साहेब' अशा प्रकारच्या घोषणा मुंडे समर्थकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कारसमोर दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने मुंडे समर्थक एकत्र आले होते. यावेळी घोषणाबाजी करत मुंडे समर्थकांनी संदीप क्षीरसागर यांना गावाबाहेर काढले.


आमदार संदीप क्षीरसागर हे बीड तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद सर्कलमध्ये काल रात्री साडेआठच्या दरम्यान गावाला भेट देत दौरा करण्यासाठी आले होते. यादरम्यान ते हिंगणी (खुर्द) येथे आले असता त्यांना मुंडे समर्थकांनी विरोध दर्शवला. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्या. या घोषणा देत त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना विरोध दर्शवत घोषणाबाजी केली.

Comments
Add Comment

भंडाऱ्यातलं जेवणं पडलं महागात, संपूर्ण गावाला विषबाधा!

नंदुरबार: नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सध्या सणा सुदीचा काळ असून

दुबईतील साईभक्ताकडून तब्बल १ कोटी ५८ लाखांचे सुवर्ण दान; सोन्यात घडवली ॐ साई राम अक्षरे

अहिल्यानगर : शिर्डी साई बाबांना हैदराबादमधील आदीनारायण रेड्डी यांनी २००८ साली सुवर्ण सिंहासन दान स्वरूपात दिले

ओबीसींचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

नागपूर : ओबीसी महासंघाकडून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे

मराठा समाजाचा जीआर सरसकटचा नाही

खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल: मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मुंबई : जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के