मुंबई: जिओच्या(jio) पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान आहेत. त्यात विविध किंमतीचे अनेक प्लान्स आहेत तसेच फीचर्स येतात. आज आम्ही तुम्हाला खास रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत.
जिओचा सर्वात स्वस्त प्लान
येथे जिओचा आम्ही सर्वात स्वस्त प्लान सांगत आहोत. यात युजर्सला कॉल, डेटा आणि साधारण एक वर्षांची व्हॅलिडिटी मिळते.
जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसेच युजर्सला कॉलसह अनेक फायदेही मिळतात.
मिळणार अनलिमिटेड कॉल
जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत १५५९ रूपये आहे. हा जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान आहे. जाणून घेऊया याच्या फायद्यांबद्दल…
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २४ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. हा प्लान त्या लोकांसाठी युझफूल आहे जे कॉलिंगवाला प्लान शोधत असतात.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ३६०० एसएमएस मिळतात. इंटरनेट डेटा संपल्यावर एसएमएसचा वापर करू शकता.
कुठे मिळणार रिचार्ज प्लान?
जिओचा हा प्लान Myjio आणि Jio.comच्या पोर्टलवर मिळेल. यासाठी प्रीपेड रिचार्जच्या आत व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये जावे लागेल.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला jio tv, jio cinema आणि jio cloudचा अॅक्सेस मिळेल.