Re-examination : मृदा जलसंधारण विभागात ६५० पदांसाठी फेरपरीक्षा

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय


मुंबई : सध्या देशभरात परीक्षांचा भलताच गोंधळ सुरु आहे. कधी पेपरफुटी तर कधी कॉपीचे भयंकर प्रकार उघडकीस येत आहेत. या प्रकरणांनी सर्वोच्च न्यायालय देखील गाठले आहे. त्यातच आता मृदा जलसंधारण विभागाच्या भरतीसंदर्भातही मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने या विभागात ६५० पदांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात ही परीक्षा पार पडणार आहे.


मृदा जलसंधारण विभागात गट 'ब' संवर्गातील पदांसाठी ही फेरपरीक्षा होणार आहे. ही परीक्षा पारदर्शक व्हावी या अनुषंगाने सात शहरांतील १० टीसीएस आणि आयओएम कंपन्यांच्या अधिकृत केंद्रांवर ती घेतली जाणार आहे. या केंद्रांवर १४, १५ व १६ जुलै रोजी ही परीक्षा पार पडणार आहे. काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा फेरपरीक्षेचा निर्णय घेतला आहे.



परीक्षा केंद्रांवर घडला होता गैरप्रकार


अमरावतीच्या (Amravati News ) ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर २० आणि २१ फेब्रुवारीला विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी लावून धरत आंदोलनाचा इशारा दिला होता. परिणामी ही परीक्षा रद्द करण्याचे आदेश राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला दिले व १५ मार्च रोजी ही भरती प्रक्रिया परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर आता राज्य सरकारने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.