Railway Megablock : प्रवाशांचे हाल! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक

'असे' असेल रेल्वे वेळापत्रकाचे नियोजन


मुंबई : मुंबईकरांची लाईफलाइन असणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) सातत्याने यंत्रणा बिघाड होत असल्याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) तिन्ही रेल्वेमार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करुनही प्रवाशांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे उद्या पुन्हा तिन्ही रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.


ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी किंवा नेरुळ स्थानकावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे.त्यामुळे प्रवाशांनी 'रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा' असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.



मध्य रेल्वे



  • कुठे : सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

  • कधी : सकाळी १०.५५ – दुपारी ३.२५ वाजेपर्यंत

  • परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – विद्याविहारदरम्यान धीम्या मार्गावर धावणाऱ्या लोकल जलद मार्गावर धावतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.


पश्चिम रेल्वे



  • कुठे : माहीम – गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर

  • कधी : सकाळी ११ – दुपारी ४ वाजेपर्यंत

  • परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वांद्रे, सीएसएमटी / पनवेल – गोरेगाव आणि चर्चगेट – गोरेगाव दरम्यानच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.


हार्बर मार्ग



  • कुठे : सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर

  • कधी : सकाळी ११.४० – दुपारी ४.४० वाजेपर्यंत

  • परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी / वडाळा ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगाव लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री