MP Crime : नदीत बुडाली होती कार; चार महिन्यांनी बाहेर काढताच आढळले 'असे' काही...

भयानक दृश्य पाहून गावकऱ्यांची उडाली खळबळ


मुरैना : देशभरात आत्महत्या, मर्डर, अपघात अशा क्राईमच्या (Crime) घटना सातत्याने समोर येत असतात. अशातच मध्य प्रदेशातील एक धक्कादायक घटना (MP Crime) उघडकीस आली आहे. मध्यप्रदेश मुरैनायेथील चार पाच महिन्यांपूर्वी एका नदीत बुडालेली गाडी बाहेर काढण्यात आली. मात्र त्या गाडीचे दरवाजे उघडताच एक भयानक दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. (Car Accident)


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मुरैना इथे एका नदीत एक कार सापडली. त्या कारची अवस्था पाहून साधारण चार - पाच महिन्यापूर्वी ती नदीत पडली असेल असा अंदाज पोलिसांनी लावला. मात्र ही कार पाण्यातून काढताच त्यातून दोन मानवी सांगाडे सापडले आहेत. हे धक्कादायक दृश्य पाहून गावात एकच खळबळ उडाली आहे.



नेमके प्रकरण काय?


मुरैना येथील गोपी गावात ग्रामस्थांना गुरुवारी कुवारी नदीत एक गाडी बुडल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांना देताच रेस्क्यू टीम आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. रेस्क्यू टीम आणि जेसीबीच्या मदतीने ती कार नदीबाहेर काढण्यात आली. गाडी बाहेर काढताच त्यातून पुरुष आणि महिलेचे सांगाडे आढळून आले.


याबाबत पोलिसांनी गावकऱ्यांची विचारपूस केली असता हे सांगाडे एका कुटुंबातील दीर आणि वहिनीचा असल्याचे सांगितले. हे दोघे पोळ्याचा पुराचे रहिवासी होती. नीरज सखवार हा मिथिलेशचा दत्तक मेहुणा होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. तर हे दोघेही फेब्रुवारी महिन्यात घरातून अचानक बेपत्ता झाले होते. या दोघांची खूप शोधाशोध करण्यात आली, मात्र ते घरातून पळून गेले असा समज गावकऱ्यांचा झाला होता.


दरम्यान, नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. परंतु हा घात आहे की अपघात याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. त्याचबरोबर मृतांचे कुटुंब आणि गावकऱ्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

उद्यापासून बदलणार आधार कार्डबाबतचे नियम

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ:

फेब्रुवारी २०२६ ला विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू सोहळा

नवी दिल्ली : भारतीय नौदल इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, फेब्रुवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील