Anil Ambani : गुंतवणूकदार झाले मालामाल! अनिल अंबानीच्या 'या' कंपनीची शेअरबाजारात तूफान तेजी

एक लाखाचे झाले तब्बल २३ लाख


मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) चढ-उतारादरम्यान मोठे उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या एका शेअरमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शेअर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. अशातच ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारावर चांगली कामगिरी करत असल्याचे चित्र दिसूत येत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या चार वर्षांत २२०० टक्क्यांनी वाढ झाल्याने अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले आहेत.



एक लाखाचे झाले २३ लाख रुपये


अनिल अंबामी यांच्या 'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर' (Reliance Infrastructure) या कंपनीच्या शेअरचे मूल्य २७ मार्च २०२० रोजी ९.२० रुपये होते. २१ जून २०२४ रोजी हाच शेअर थेट २१४.८५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या चार वर्षांत या कंपनीने दमदार कामगिरी करत त्याच्या मूल्यात २००० टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. म्हणजेच गुंतवणूक दारांनी एक लाख रुपये गुंतवले असता आज त्याचे तब्बल २३.३५ लाख रुपये झाले असते अशी माहिती मिळत आहे.



एका वर्षात ४५ टक्क्यांनी वाढ


या कंपनीची एका वर्षातील कामगिरी पाहायची झाल्यास हा शेअर गेल्या एका वर्षात ४५ टक्क्यांनी वाढला आहे. या एका वर्षात या कंपनीचा शेअर १४७.७५ रुपयांवरून २१४.८५ रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरध्ये १३७ टक्क्यांची तेजी आली आहे. तर गेल्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर २८ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या ५२ आठवड्यांत या कंपनीच्या शेअरचे सर्वोच्च मूल्य ३०८ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांतील नीचांकी मूल्य १३४.८५ रुपये आहे.



विजय केडिया यांनी खरेदी केलेत ४०लाख शेअर्स


दिग्गज गुंतवणूकदार विजय किशनलाल केडिया यांनीदेखील अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत मोठी गुंतवणूक केलेली आहे. ट्रेंडलाइनच्या डेटानुसार विजय केडिया यांनी मार्च २०२४ च्या तिमाहीत रिलायन्स इन्फ्राचे ४० लाख शेअर्स खरेदी केलेले आहेत. कंपनीत त्यांची एकूण हिस्सेदारी १.०१ टक्का आहे.

Comments
Add Comment

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या