जयेश भारती राम पंडागळे यांनी आता मनोरंजन क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवले आहेत. मनोरंजनासोबत समाजप्रबोधन करण्याच्या दृष्टीने त्यांनी महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची दखल घेतलेला ‘ बोला जय भीम’ हा म्युझिक अल्बम रिलीज केला आहे. हा त्यांच्या जीवनातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला आहे.
‘ वन लाइफ ‘ ही शॉर्ट फिल्म बनवून, त्यांनी या क्षेत्रातील कामाची सुरुवात केली. त्यानंतर ‘माफिया तडका’ ही शॉर्ट फिल्म त्यांनी बनवली. ‘हर लम्हा’ या म्युझिक अल्बममध्ये त्यांनी साकारलेला रोमँटिक नायक आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. त्यात शेवटी नायकाचा झालेला मृत्यू मनाला चटका लावून जातो. त्यानंतरचा त्यांचा आलेला ‘मस्त मौला’ हा म्युझिक अल्बम देखील गाजला.
‘बोला जय भीम’ हा त्यांचा हिंदी म्युझिक अल्बम सध्या गाजतोय. जवळपास एक वर्ष या अल्बमच्या तयारीसाठी लागले. या अल्बमचे वैशिष्ट म्हणजे याची गाणी त्यांच्या वडिलांनी म्हणजे मा. आमदार रामभाऊ पंडागळे यांनी लिहिलेली आहेत. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती सर्व लोकांना व्हावी या हेतूने हा अल्बम हिंदी भाषेमध्ये आणलेला आहे. कारण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. या अल्बममध्ये संविधानामुळे आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा, मनुस्मृती जाळण्याचा, हिंदू कोड बिलाचा उल्लेख आहे. रखरखत्या उन्हात फिल्मसिटीमध्ये या अल्बमचे शूटिंग करण्यात आले. तळपत्या सूर्याच्या साक्षीने मोठ्या उत्साहाने साऱ्यांनी या अल्बमचे शूटिंग केले.
या अल्बमचे शूटिंग करताना, जयेश पंडागळे यांना खूप आनंद झाला, कारण हे गाण करायचं, त्यांचे खूप वर्षांपासूनचे स्वप्न होते. भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीसमोर त्यांना नतमस्तक होता आले. त्यांच्यावर गाणे निर्माण करता आले. त्यांना वडिलांसोबत काम करण्याचा अभिमान वाटला. त्यांचा बाबासाहेबांच्या प्रती असलेला आदर या अल्बममधून पाहायला मिळाला. शूटिंगच्या दरम्यान मोठमोठाले ढोल वाजवताना त्यांना जरा देखील थकवा आला नाही. उलट शूटिंग संपल्यानंतर देखील ते ढोल वाजवून नाचत राहिले. शूटिंग संपल्यावर फार लवकर शूटिंग संपले, असे त्यांना वाटले.
फिरोज शेख (विकी) यांनी या अल्बमचे दिग्दर्शन व कोरिओग्राफी केलेली आहे. गाण्यामध्ये भव्यदिव्यपणा आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. जयेश पंडागळे यांच्यासोबत या अल्बममध्ये त्यांचे वडील मा. आमदार रामभाऊ पंडागळे, हर्षा चौहान, ज्योती जयंत, लियाकत नसीर हे सारे आहेत. राजू काळे व पंकज वांगुर्से यांनी गीत लेखनास सहाय्य केले. या अल्बमला राजेंद्र साळुंकी यांनी संगीत दिले आहे. या अल्बमचे छायांकन रोहित येवले व गिफ्टी मेहरा यांनी केले. या अल्बमचे गायन शाहीद मल्ल्यानी गायिले.
‘बोला जय भीम’ म्हणत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहणाऱ्या जयेश पंडागळेंना या अल्बमसाठी व आगामी चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा!
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…