
मुंबई: संपूर्ण जगभरात आज २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस(international yoga day) साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळेस श्रीनगरमध्ये आहेत. योग दिवसाच्या निमित्ताने ते संपूर्ण देशाला संबोधित करत आहेत. यानंतर ते श्रीनगरमध्ये सामूहिक योगा करतील. केंद्रीय मंत्रीही आज देशातील विविध भागांमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करत आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषी मंत्री शिवराज चौहान दिल्लीत योगा करत आहे. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्राने २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जावा असा निर्णय घेतला होता. आज २१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात छोटी रात्र असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये पोहोचले. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीनगरमध्ये तरुणांचे सशक्तीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये बदल या कार्यक्रमास सुरूवात केली. या दरम्यान त्यांनी जम्मू-काश्मीरला तब्बल ३३०० कोटी रूपयांचे बक्षीस दिले. यासोबतच शासकीय सेवांसाठी २०००हून अधिक लोकांना नियुक्ती पत्रही दिले.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीर योग साधनेची भूमी आहे. येथे उत्पादकता आणि सहनशक्ती वाढते आहे. योगमुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. योगा केवळ विद्या नाही तर विज्ञान आहे. योगामुळे एकाग्रता वाढते. योगावर आता संशोधन केले जात आहे. योगा टूरिझ्मचा नवा ट्रेंड बनत आहे.