मुंबई: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये पोहोचेपर्यंत कोणताही सामना हरलेला नाही. मात्र आता खरी परीक्षा सुरू होत आहे. यूएसएची पिच आतापर्यंत गोलंदाजांना अनुकूल राहिली आहे. याचा जसप्रीत बुमराहसह इतर भारतीय वेगवान गोलंदाजांनी भरपूर फायदा उचलला. पाकिस्तान आणि यूएसएविरुद्धच्या सामन्यात एकवेळेस टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार होती. यावरून संकेत होते की संघामध्ये काही कमकुवत बाबी जरूर आहेत
ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा फॉर्म पाहता भारतासाठी हा रस्ता काही सोपा नाही. भारत २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेला नाही.
विराट कोहली टी-२० वर्ल्डकपच्या सुरूवातीपासून रोहित शर्मासोबत सलामीवीराची भूमिका निभावत आहे. त्याने आतापर्यंतच्या ३ सामन्यात केवळ ९ बॉल क्रीझवर टिकून होता. यात त्याने केवळ ५ धावा केल्यात. कोहलीला भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा मानला जातो. अशातच त्याने फॉर्ममध्ये येणे महत्त्वाचे आहे.
भारताच्या टी-२० वर्ल्डकप स्क्वॉडमध्ये कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलच्या रूपात २ रिस्ट स्पिनर आहेत. मात्र अद्याप त्यांचा उपयोग करण्यात आलेला नाही. आता वर्ल्डकपचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहे. येथे पिच स्पिन गोलंदाजीसाठी अनुकूल ठरू शकते.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात रूात भारताचे सलामीचे फलंदाज वर्ल्डकपमध्ये निष्फळ ठरले आहेत. दरम्यान तिसऱ्या स्थानावर खेळताना ऋषभ पंतने सर्व सामन्यात टिकून फलंदाजी केली. मात्र सलामीची जोडी अपयशी ठरल्याने मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव येत आहे. अशातच सूर्यकुमारने एका अर्धशतकाशिवाय २ डावांत केवळ ९ धावा केल्या.
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…