बार्बाडोस: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मधील सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. भारताने अफगाणिस्तानला ४७ धावांनी हरवले. या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली.
भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानच्या संघाला केवळ १३४ धावा करता आल्या. आधी सूर्यकुमार यादवने धावांचे वादळ आणले. त्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कहर केला. त्याच्या जोरावर भारताला हा विजय साकारता आला.
सुपर ८मध्ये दोन्ही संघांचा हा पहिला सामना होता. आता भारतीय संघ आपला पुढचा सामना २२ जूनला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. हा सामना अँटिग्वामध्ये खेळवला जाईल.
भारताला पहिल्या ११ धावांवर धक्का बसला तो रोहित शर्माच्या रूपाने. रोहितने केवळ ८ धावा केल्या. ऋषभ पंत मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच २० धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परला. त्यानंतर विराट कोहली स्थिरस्थावर होईल असे वाटत असतानाच तोही बाद झाला.
भारताचे तीन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने शिवम दुबेच्या मदतीने खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुबे १० धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्याने हार्दिकला हाताशी घेतले आणि धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने २८ बॉलमध्ये ५३ धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या २४ बॉलमध्ये ३२ धावा करून बाद झाला.
शेवटच्या काही ओव्हर्समध्ये भारताचे फलंदाज झटपट बाद होत गेले. त्यामुळे भारताचा डाव १८१ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर गोलंदाजीतही भारताने जबरदस्त कामगिरी केली. अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी ३ विकेट काढल्या. तर कुलदीप यादवला २ आणि अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…