Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीSandeep Deshpande : हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवलेले पांचट जोक मारतायत!

Sandeep Deshpande : हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवलेले पांचट जोक मारतायत!

मनसेचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला

मुंबई : लोकसभेनंतर (Loksabha) राज्यातील सर्व राजकीय पक्ष (Political parties) आता विधानपरिषद निवडणुकांच्या (Vidhanparishad Elections) तयारीला लागले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा तापातापीचं वातावरण पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर वार पलटवार करायला सुरुवात केली आहे. त्यातच काल शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) टीका केली. ‘लोकसभा निवडणुकीत काहींनी मोदींना बिनशर्ट पाठिंबा दिला’, असं ते म्हणाले. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, “हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्यामुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत. पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांचे कपडे शाबूत ठेवणार नाही”, अशा खोचक शब्दांत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -