Road Potholes : पावसाळा सुरू झाला तरी सिमेंट रस्त्यांचे खड्डे कायम!

  75

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या तंबी नंतर आयुक्तांनी दिलेली डेडलाईन धुडकावली


भाईंदर : निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शहरातील सर्व ठिकाणी रखडलेली सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे, विस्कळीत झालेले जनजीवन, वाहन चालक आणि नागरिक यांचे होणारे हाल प्रत्यक्ष अनुभवले. त्यानंतर थेट आयुक्तांशी संपर्क साधून तंबी दिल्यानंतर सिमेंट रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावे असे महापालिका आयुक्तांनी सांगितले होते. मात्र डेड लाईन धुडकावत मीरा रोड येथे सिमेंट रस्त्यांचे खड्डे कायम असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यासाठी दिलेल्या कार्य आदेशाची मुदत पुर्ण होऊन आठ महिने झाले तरी मीरा रोड येथील पूनम गार्डन रोडचे सिमेंट काँक्रिटी करणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. पावसाळा सुरू झाला तरी रस्त्यासाठी केलेला मोठा खड्डा तसाच पडून असल्याने तसेच पावसाळा सुरू झाल्याने त्यात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे वाहने आणि नागरिकांना कठीण प्रवास करावा लागत आहे.


निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शहरातील सर्व ठिकाणी रखडलेली सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे,त्यामुळे नागरिकांना होणारा प्रचंड त्रास प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर त्यांनी आयुक्तांशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आयुक्तांनी हा विषय गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी सिमेंट रस्त्यांची सर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करून नागरिकांना रहदारीसाठी पूर्ववत करून देण्याचे आदेश दिले होते. परंतु ठेकेदार,महापालिका अभियंते यांनी आदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यासोबत आयुक्तांनी दिलेली डेड लाईन उलटून २० दिवस झाले, तरीसुध्दा मीरा रोड येथील पुनम गार्डन रस्त्यावर सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी खणून ठेवलेला रस्त्या तसाच अर्धवट अवस्थेत पडून असल्याची तक्रार समाजसेवक नितीन नाईक यांनी आयुक्तांकडे केली असून नागरिकांना जीव मुठीत धरून जाण्यापासून मुक्तता देण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही