मुंबई : दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते. परंतु काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्ष अमावास्येला वटपौर्णिमेचा (VatPurnima 2024) उपवास केला जातो. यंदा २१ जून २०२४ ला म्हणजेच शुक्रवारी वटपौर्णिमेचे व्रत केले जाणार आहे. योगायोगाने याच दिवशी काही शुभ राजयोग (Shubh Rajyog) देखील जुळून येणार आहेत. या शुभयोगाचा प्रभाव काही राशींच्या (Horoscope) आयुष्यात दिसून येणार आहे. त्यामुळे या राशींचे भाग्य चांगलेच उजळणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.
ज्योतिषशास्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी तीन राजयोग सक्रिय होणार आहेत. त्रिगही योग, बुधादित्य योग व शुक्रादित्य योग या दिवशी मिथुन राशीत सक्रिय असणार आहेत. १४ जूनला मिथुन राशीत बुध ग्रहाने गोचर केले होते, तत्पूर्वी शुक्राने या राशीत प्रवेश केला होता. सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश होताच हे तिन्ही राजयोग सक्रिय होणार आहेत. आज रात्री ८ वाजून १३ मिनिटांपासून उद्या म्हणजेच २१ जून संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत हे राजयोग अधिक सक्रिय असणार आहेत.
मिथुन राशीतच सर्व राजयोग निर्माण होत असल्याने आपल्याला लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. पण यावेळी या राशीतील लोकांना दुर्लक्षितपणे वागून चालणार नाही. कामाच्या बाबतची स्थिती आवाक्यात येईल. स्त:च्या मतावर ठाम राहून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करु शकतील. अनपेक्षित मार्गातून धनलाभ देखील होणार आहे.
या राशीतील लोकांचे कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. कामातील त्रुटी भरून काढाव्यात. वैचारिक स्थिरता जपावी. सामाजिक क्षेत्रातील लोकांना प्रतिष्ठा लाभेल. त्याचबरोबर भागीदारीत केलेल्या व्यवसायातून धनलाभही मिळू शकतो.
मीन राशीच्या लोकांचे वैवाहिक सुख लाभण्याची शक्यता आहे. कामातील चढउताराचा आढावा घ्या. त्याचबरोबर वादाचे मुद्दे सोडून जोडीदाराचे मन सांभाळण्याचा प्रयत्न करावा.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…