लक्ष्मण हाकेंचे ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत

मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप


छत्रपती संभाजीनगर : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगेंनी टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याच मनोज जरांगेंनी यावेळी सांगितले आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. तसेच एकाही तरूणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती देखील मनोज जरांगेंनी केली आहे.

भारतात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांची मागणी ते करतात मी माझ्या समाजावर ठाम आहे. ते दिशाभूल करत आहेत. दिशाभूल करायची ती करू द्या. त्यांना आरक्षण संविधानाने दिले आहे. एससी, एसटीला धक्का लागणार नाही त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याचे आंदोलन सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. आधीचे आणि आताचे आंदोलन पाहिल्यावर लक्षात येत आहे. आंदोलनाला एवढे लोक येतात त्यावरुनच लक्षात येते. आंदोलकांना मी काही म्हणत नाही मात्र हे सरकार घडवून आणत आहे.

बीडमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. ओबीसी बांधवांनी बीडच्या तलवाडा फाटा परिसरात महामार्ग अडवला. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्या हाेत्या. आंदोलकांनी सोलापूर-धुळे महामार्गावर टायर पेटवत रास्ता आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने राज्यभरातून लोक उपोषणस्थळी येत आहेत. नांदेड सकल ओबीसी समाजाचा लक्ष्मण हाकेंना पाठिंबा आहे. हाके यांच्या आमरण उपोषणाला सातवा दिवस उलटन गेले आहेत. त्यातच त्यांची प्रकृती खालवली आहे.
Comments
Add Comment

Latur : लातूरसाठी ‘देवाभाऊ’ आरोग्यदूत, १०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

लातूर : लातूर जिल्ह्याच्या आरोग्य संवर्धनासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या १०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा

Chitra Wagh : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त करणार, चित्रा वाघ कडाडल्या

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. तपास पथक आरोपींविरोधात

Fighter Jet Emergency Landing Pune : पुण्यात लढाऊ विमानाचे अचानक लँडिंग; करावे लागले चक्क विमानतळ बंद; नेमकं काय घडलं त्या रात्री?

पुणे : विमानाचा अपघात आता रस्ते अपघातासारखा सर्वसाधारण झालाय. काल पुण्याच्या धावपट्टीवर रात्री एक लढाऊ विमानाचे

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही