Chitra Wagh : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त करणार, चित्रा वाघ कडाडल्या

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. तपास पथक आरोपींविरोधात जास्तीत जास्त ठोस पुरावे गोळा करण्यात गुंतले आहे. जर आपल्याला काही माहिती असेल अथवा तक्रार करायची असेल तर थेट पोलिसांना माहिती द्या, असे भाजप आमदार चित्रा वाघ म्हणाल्या. त्यांनी अशोक खरात आणि नाशिक टीसीएस प्रकरणात दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी सरकार कायद्याच्या चौकटीत राहून आवश्यक ते काम करत असल्याचे सांगितले.


सरकारी, निमसरकारी, खासगी अशा प्रत्येक आस्थापनेत शोषण होत असल्यास तक्रार करण्यासाठी आणि त्या तक्रारीची दखल घेऊन निःपक्षपाती चौकशी करून अहवाल देण्यासाठी समिती आवश्यक आहे. समितीने दोषी ठरवलेल्यांवर आस्थापनेकडून तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. आवश्यक तिथे पुढे जाऊन कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांत तक्रार नोंदवणेही आवश्यक आहे. पण टीसीएस सारख्या अनेक खासगी आस्थापनांमध्ये तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यासाठी समिती नाही किंवा असली तर ती समिती निःपक्षपाती नाही. यामुळे महिला तक्रार करणे टाळतात. काही वेळा नोकरी जाण्याच्या भीतीने तक्रार टाळली जाते. प्रामुख्याने खासगी आस्थापनेत नोकरी टिकवण्यासाठी तक्रार टाळण्याचे प्रकार घडतात. यावर ठोस उपाय करणे आवश्यक आहे. बदलत्या कार्यालयीन संस्कृतीचा आणि तंत्रज्ञानाचा विचार करून कायद्यांमध्ये दुरुस्तीची आवश्यकता आहे. या संदर्भात लवकरच तज्ज्ञांशी चर्चा करून सरकारी पातळीवर आवश्यक तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिले.


आस्थापन सरकारी, निमसरकारी, खासगी अशा कोणत्याही प्रकारचे असू दे... तिथे आलेल्या तक्रारीची एक नोंद सरकारकडे व्हायला हवी. तक्रारीवर ९० दिवसांत निर्णय दिला नाही तर समितीवरच दंडाची तरतूद हवी. महिला - पुरुष यापैकी कोणीही असतील त्यांना कार्यालयात अथवा वर्क फ्रॉम होम करताना शोषणाला सामोरे जावे लागले. थेट बोलून अथवा कृती करून किंवा डिजिटल संवादातून (WhatsApp, Email) वा आस्थापनाशी संबंधित कार्यक्रम, बैठक, सहल अशा ठिकाणी शोषणाला सामोरे जावे लागल्यास तक्रार करण्याची आणि त्यावर आवश्यक ती कारवाई करण्याची व्यवस्था हवी. यासाठी तक्रारीची दखल घेऊन निःपक्षपाती चौकशी करून अहवाल देणारी समिती प्रत्येक आस्थापनेत हवी. समितीने दोषी ठरवलेल्या व्यक्तीवर आस्थापन व्यवस्थापनाने कारवाई करणे आणि आवश्यकता भासल्यास पोलीस कारवाई करणे आवश्यक आहे. या सगळ्याकरिता कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे, एका SOP चीही गरज आहे. लवकरच या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्यापुढे हा विषय सविस्तर मांडणार असल्याचे संकेत चित्रा वाघ यांनी दिले.


राज्यात महिला आयोगाचे पद रिक्त असले तरी अधिकारी काम करत आहेत. राज्याच्या महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. बारामतीच्या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हा प्रश्न लवकरच सोडवतील असेही चित्रा वाघ म्हणाल्या. अशोक खरात आणि नाशिक टीसीएस प्रकरणी तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सरकार कायद्याच्या चौकटीत राहून आवश्यक ते काम करत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. महिलांचे शोषण करणाऱ्या आरोपींना सोडणार नाही, अशी ग्वाही चित्रा वाघ यांनी दिली.


महिला आरक्षण प्रश्नावरही चित्रा वाघ बोलल्या. काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाने महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकाला संसदेत विरोध केला असे चित्रा वाघ यांनी सांगितले. महिला आरक्षण विधेयक पडणे ही दुःखद घटना आहे. ही घटना घडली तो दिवस देशातील महिलांसाठी काळा दिवस होता. देशातील मातृशक्तीचा हक्क हिरावला गेला. आरक्षणाची तरतूद झाली असती तर विरोधी गटातील महिलांनाही फायदा झाला असता असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास