Amazon Parcel : धक्कादायक! अ‍ॅमेझॉनचे पार्सल उघडताच बाहेर आला विषारी साप

कंपनीने दिले 'हे' उत्तर


बंगळुरु : काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिममध्ये मानवाचे बोट सापडले होते. तर दुसरीकडे अमुल आईस्क्रिमच्या डब्यात गोम आढळली होती. हे प्रकरण ज्वलंत असताना आणखी अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. अ‍ॅमेझॉन (Amazon) ही नावाजलेली कंपनी लाखोंच्या सेवेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र बंगळुरु येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला या कंपनीबाबत भीतीदायक अनुभव आला आहे. या दाम्पत्याने अ‍ॅमेझॉनवरुन एक पार्सल (Amazon Parcel) मागवले होते. मात्र पार्सल हाती येताच त्यात चक्क जिवंत साप बाहेर आला. हा साप पाहून दाम्पत्याची भीतीने गाळण उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दाम्पत्याने पार्सल मागवले होते ते दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी एक्स बॉक्स कंट्रोलर ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र जेव्हा त्यांचा बॉक्स आला तेव्हा त्यात चक्क साप निघाला. कोब्रा या जातीचा हा विषारी साप पाहून या दोघांची पाचावर धारण बसली. हा विषारी साप पॅकिंगच्या टेपमध्ये अडकला होता त्यामुळे सुदैवाने या दोघांना काहीही इजा झाली नाही. मात्र अ‍ॅमेझॉनसारख्या नावाजलेल्या कंपनीबाबत असा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



दाम्पत्याने तयार केला व्हिडीओ


या धक्कादायक प्रकारानंतर बंगळुरुतल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने याबाबत एक व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत त्यांनी हे म्हटले की, आम्ही अ‍ॅमेझॉनवरुन एक्सबॉक्स कंट्रोलर मागवला होता. त्या बॉक्समध्ये जिवंत साप होता. अ‍ॅमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयने हा बॉक्स आमच्या हातात दिला नाही तर तो आमच्या घराबाहेर हा बॉक्स ठेवून गेला होता. आम्ही बंगळुरुतल्या सराजपूर रोड या ठिकाणी असलेल्या इमारतीत राहतो. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.


दाम्पत्याने व्हिडीओमध्ये असे म्हटले की, 'सुदैवाने तो साप पॅकिंग टेपमध्ये अडकला होता. त्यामुळे त्याने आम्हाला काहीही इजा केली नाही. आम्ही याबाबत कंपनीला म्हणजेच अ‍ॅमेझॉनला संपर्क केला. त्यांच्या ग्राहक सेवेच्या अधिकाऱ्यांनी दोन तास तुम्हीच या प्रसंगाशी दोन हात करा असे सांगितले. त्यामुळे साप असलेला बॉक्स समोर ठेवत त्यावर लक्ष ठेवण्याची वेळ आमच्यावर अर्ध्या रात्री आली. आम्ही जे पैसे दिले होते ते आम्हाला कंपनीने परत दिले आहेत. मात्र विषारी साप आल्याचा जो धोका होता त्याचे काय? साप कुणाला चावला असता तर जीवही जाऊ शकला असता. अ‍ॅमेझॉन या कंपनीने निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे या घटनेसाठी कोण जबाबदार आहे?' असा प्रश्न देखील दाम्पत्याने केला आहे.


दरम्यान, इंजिनिअर दाम्पत्याने जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यावर अ‍ॅमेझॉन कंपनीने खेद व्यक्त केला आहे. ग्राहकांना जो त्रास सहन करावा लागला त्यामुळे आम्हाला वाईट वाटले. आमची टीम लवकरच तुम्हाला याबाबत माहिती देऊ असे कंपनीने म्हटले आहे.




Comments
Add Comment

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष