बारामुल्ला : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी राज्यात बंदोबस्त वाढवला आहे. अशातच, आज काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून, एक एसओजी (जम्मू-काश्मीर पोलीस) जवान जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई सुरू असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यातील सोपोरमधील हदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार केला, या घटनेत दोन दहशतवादी ठार झाले. मात्र, अद्याप दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. दरम्यान, या चकमकीत एसओजीच्या एका जवानाला गोळी लागली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिसरात शोधमोहिम सुरू आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…