Vasai murder news : वसईत भर रस्त्यात डोक्यात स्पॅनरने वार करत प्रियकराने केली प्रेयसीची हत्या!

रक्ताच्या थारोळ्यात पडली तरुणी; बघ्यांची गर्दी पण वाचवायला कोणीच आलं नाही


वसई : प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना वसईतून समोर आली आहे. वसईत भर रस्त्यात एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी पान्याने वार करत तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, तो हे कृत्य करत असताना रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमलेली असूनही वाचवायला मात्र कोणीच पुढे आलं नाही. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील चिंचपाडा येथे एका वीस वर्षीय तरुणीला आज सकाळी साडेआठच्या सुमारास एका तरुणाने बेदम मारहाण केली. हल्लेखोराने स्पॅनरचा वापर करून तिच्या डोक्यावर हल्ला केला. ती तडफडत असताना तो तिच्यावर वार करतच राहिला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला अडवण्याची हिंमत केली नाही. हे वार करत असताना तो सतत 'माझ्यासोबत असं का केलं?' असा प्रश्न विचारत होता. ती मेल्यानंतर देखील तो प्रश्न विचारत होता. या अत्यंत क्रूर प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेकअपच्या रागातून आरोपीने प्रेयसीची हत्या केली आहे. रोहित यादव असं आरोपीचं नाव आहे. तर आरती यादव असं मृत तरुणीचं नाव आहे. सध्या तरुणीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत.



दिल्लीतील हत्याकांडाची पुनरावृत्ती


वसईच्या या घटनेने दिल्लीच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत प्रियकराने १६ वर्षांच्या प्रेयसीला चाकूने भोसकले होते. आरोपीने तरुणीवर चाकूचे ४० वार केले होते. जिथे हत्याकांड घडले तिथे लोक आजूबाजूने जात होते, मात्र काहीच घडलं नाही अशा अविर्भावात दुर्लक्ष करुन निघून जात होते. कोणीही धाडस करत अल्पवयीन मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता. आता तब्बल एक वर्षांनंतर वसईतदेखील घडलेल्या या घटनेने दिल्ली हत्याकांडाचा घटनाक्रम पुन्हा चर्चेत आला आहे.


Comments
Add Comment

Water Cut : पुण्यात सोमवारपासून २५ टक्के पाणीकपात

पुणे : यंदा पावसाळा लांबल्यामुळे आणि धरणसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात

Konkan Railway : कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी तांत्रिक तपासणी सुरू

रत्नागिरी : वाढती प्रवासी आणि मालवाहतूक, वारंवार विस्कळीत होणारे वेळापत्रक आणि गणेशोत्सव काळातील अतिरिक्त

Nasrapur : नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात

पुणे  : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी

Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन दोन दिवस बंद राहणार

पंढरपूर : पंढरपुरचे विठ्ठल मंदिर २३ आणि २४ जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली